Breaking News

सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई ५ तासांत अपहरणाचा छडा; अपहरण झालेल्या इसमाची सुखरूप सुटका ; ३ आरोपी अटकेत, पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.

सांगोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई ५ तासांत अपहरणाचा छडा; अपहरण झालेल्या इसमाची सुखरूप सुटका ;


३ आरोपी अटकेत, पिस्टल व जिवंत काडतूस  जप्त.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सांगोला पोलीस यांनी अवघ्या ५ तासांत अपहरण प्रकरणाचा छडा लावत अपहरण झालेल्या इसमाची सुखरूप सुटका केली आहे. 

या कारवाईत ३ आरोपींना अटक, १ पिस्टल, २ जिवंत काडतूस व १ चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मिरज–सांगोला रोडवरील हातीद पुलाच्या मागे हातीद (ता. सांगोला)

 येथे दत्तात्रय विलास वलेकर (रा. उदनवाडी, ता. सांगोला) यांचे अज्ञात इसमांनी इर्टिका कारमधून जबरदस्तीने अपहरण केले.

      या घटनेची फिर्याद रामेश्वर उत्तम शेळके (वय २५, रा. करांडेवाडी) यांनी दिल्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ९४६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२), १४०(२) 

सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ४, २५ अंतर्गत दिनांक २७/११/२०२५ रोजी दुपारी २.०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.संदर्भिय गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन

 पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तातडीने सक्रिय झाले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय 

बातमीदारांच्या मदतीने अवघ्या ५ तासांत विजयनगर (सांगली) परिसरातून अपहरण झालेल्या इसमाची सुटका करण्यात आली.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे :

1. गोरखनाथ मारुती कदम (वय ४१) – रा. श्रीरामनगर, विश्रामबाग, सांगली

2. महादेव गोपाळ खांबले (वय २३) – मूळ रा. खेमेवाडी, ता. खानापूर, जि. बेळगाव; सध्या सांगली

3. अजिंक्य नारायण मासाळ (वय २३) – रा. विश्रामबाग, सांगली.

तपासात निष्पन्न झाले की आरोपींनी अपहरण करून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

 आरोपी गोरखनाथ कदम याच्या अंगझडतीतून १ पिस्टल व २ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत.

तो वापरात असलेली इर्टिका कार (MH 14 GN 6073) देखील ताब्यात घेण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई...

सदरची  कारवाई ही सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व 

उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या केलेल्या कारवाईत 

सांगोला पोलीस निरिक्षक विनोद घुगे,PSI  चंद्रकांत पुजारी, पो.हे.कॉ अस्लम काझी, नवनाथ सावंत, मच्छिंद्र राजगे, सुरेश माळी, अमर पाटील, मारुती पांढरे, 

कैलास खटकाळे तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीणचे जुबेर तांबोळी यांनी सहभाग नोंदवला.पुढील तपास PSI चंद्रकांत पुजारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments