खर्डी येथे १६ लाख १६ हजाराचा अद्रेयल कंपनीची दारू साठा आणि वाहने जप्त
पंढरपूर - पंढरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करताना संशयास्पद दोन वाहनांची तपासणी करताना
त्या मधील १६ लाख १६ हजारांची अॅड्रियल कंपनीची दारू आणि दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,
आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
यांनी पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून संशयित वाहने चेक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी खर्डी येथील चौकात नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी साठी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर ,
पोलीस उपनिरीक्षक कविता मुजावर, पोलीस हवालदार सुजित उबाळे, विजयकुमार आवटी असे अधिकारी व अंमलदार नाकाबंदी करत असताना सांगोला रोडच्या दिशेने येणाऱ्या दोन गाड्या त्यामध्ये
एक अशोक लेलँड व दुसरी एसी.एक्स कार संशयितरित्या नाकाबंदी ठिकाणापासून काही अंतरावर थांबल्या. बराच वेळ थांबून राहिल्यामुळे पोलिसांना त्या दोन्ही गाड्यांचा संशय आल्याने पोलिसांनी गाड्यांच्या जवळ जाऊन पाहणी केली असता
त्यातून दोघेजण पळून गेले व एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपले नाव पप्पू बनसोडे (रा. सांगोला विकास तुकाराम होनमाने (रा. जुनोनी ता. सांगोला) असे असल्याचे सांगितल.
त्यानंतर सदर वाहनचालकाकडे विचारपूस केली असता त्याने अशोक लेलँड व कार मध्ये किराणामाल असल्याचे सांगितल्यानंतर कारची आणि अशोक लेलँड ची संपूर्ण तपासणी केली. त्यावेळी कार मध्ये बोगस नंबर प्लेट
दिसल्यानंतर पोलिसांना जास्त संशय आल्याने अशोक लेलँड मधील मागील बाजूची तपासणी केली असता अॅड्रियल व्हिस्की नावाची दारूचे एकूण इतके १५० बॉक्स ( एकूण सुमारे २ लाख १६ हजार ) व अशोक लेलँड (किंमत रुपये सात लाख)
तसेच कार असा एकूण १६ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून तीन आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल दाखल केलेला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे श्री. शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक श्री.कवितकर , विक्रम वडणे,
पीएसआय भारत भोसले व मुंडे तसेच हवालदार सुजित उबाळे, पोलीस हवालदार ताजोदीन मुजावर, विनायक नलावडे तात्या गायकवाड मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी, यांच्या पथकाने केली.


0 Comments