सांगोला नगरपरिषदांच्या प्रचारासाठी उमेदवारांना ५ दिवसच!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पंढरपूर नगरपरिषदेतून एकमेव अर्ज आला होता.
दुसऱ्या दिवशी दुधनी, मंगळवेढा व अनगर येथून पाच जणांनी सहा अर्ज भरले. अजूनही आठ नगरपरिषदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अर्ज भरण्यासाठी अजून पाच-सहा दिवस शिल्लक आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी, करमाळा, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ व अकलूज नगरपरिषदांसह अनगर या एकमेव नगरपंचायतीसाठी आता मतदान होणार आहे.
या निवडणुकीत चार लाख ४३ हजार ६०५ मतदार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण मतदारांमध्ये ११ हजार ५१४ दुबार-तिबार मतदार आहेत. त्यांच्या घरोघरी जाऊन ते कोठे मतदान करणार आहेत, यासंदर्भात लेखी घेतले जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची महायुती होणार की विरोधकांची आघाडी होणार? हे अजूनही निश्चित झालेले नाही. काही पक्षांकडून जरी नगरपरिषदांमध्ये आपल्याला बहुमत नाही मिळाले
तरी नगराध्यक्ष आपलाच व्हायला हवा, अशी रणनीती आखली जात आहे. या पार्श्वभूमीवर तगडा व लोकप्रिय उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांकडून सुरु आहे.


0 Comments