सांगोला दक्षता हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी यांच्यावतीने
१५ नोव्हेंबर रोजी नंदेश्वर येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला व मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला यांच्या वतीने शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , नंदेश्वर येथे करण्यात आले आहे.
सदरच्या शिबिर हे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले असून या शिबिरामध्ये मेडिसिन विभाग, हृदयरोग विभाग , मुत्ररोग विभाग , अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग तसेच सर्जरी व गॅस्ट्रोइंटरोलॉजी विभाग
,त्वचा रोग विभाग यांचे सर्व तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. बीपी, दमा, मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार तसेच मूत्ररोग, प्रोस्टेट ग्रंथीची सूज ,मुतखडा ,मूत्राशयाचे आजार, किडनीचे आजार ,
किडनीतील खडे ,मूत्रवाहिनीतील खडे ,त्वचेला खाज सुटणे,त्वचा विकार,जुनाट त्वचेचे आजार,त्वचेवरील पांढरा कोड,त्वचेचे व्रण,त्वचेची ऍलर्जी-इन्फेक्शन इत्यादी त्रास असणाऱ्या रुग्णांनी सदरच्या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
केशरी, पिवळे आणि पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे तसेच ज्या हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना अँजिओप्लास्टी चा सल्ला दिला आहे
त्या रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया अथवा अँजिओप्लास्टी ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे
तरी सांगोला व मंगळवेढा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सदरच्या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.शिबिरासाठी संपर्क- 9423327304,8484069005,9145124579.



0 Comments