google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'मानसी गाेडसे एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात दुसरी'; मुलीने वडिलांचे काबाडकष्ट अन् माेलमजुरीचे पांग फेडले..

Breaking News

'मानसी गाेडसे एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात दुसरी'; मुलीने वडिलांचे काबाडकष्ट अन् माेलमजुरीचे पांग फेडले..

'मानसी गाेडसे एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात दुसरी'; मुलीने वडिलांचे काबाडकष्ट अन् माेलमजुरीचे पांग फेडले..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महूद : स्वतःकडे बौद्धिक गुणवत्ता असूनही शासकीय सेवेत संधी मिळाली नाही. ही सल मनात ठेवून वडिलांनी काबाडकष्ट आणि मोलमजुरी करून मुलींना उच्च शिक्षित केले. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या लक्ष्मीनगर (ता.सांगोला) येथील मानसी मधुकर गोडसे हिने राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या वनसेवा परीक्षेतून सहायक वनसंरक्षक वर्ग एक पदाला गवसणी घातली आहे.

लक्ष्मीनगर येथील मधुकर गोडसे यांचे आहे. वडिलांनीच शेती विकल्याने भूमिहीन असलेले मधुकर गोडसे यांनी परिस्थितीशी झगडत झुंजत सुमारे २५ वर्षांपूर्वी एम.ए. बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. 

गुणवत्ता असूनही परिस्थितीमुळे त्यांना कोठेही सेवेची संधी मिळाली नाही. मात्र हे स्वप्न लेकरांच्या माध्यमातून पूर्ण करायचा त्यांनी ध्यास घेतला.

लक्ष्मीनगरसारख्या भागात बागा छाटणी, मोलमजुरी करणे यासारखी कामे करून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 

नरळेवाडी (ता.सांगोला) येथे अर्धा एकर शेती घेऊन त्यात पत्रा शेड मारून हे कुटुंब राहत आहे. पत्नी, थोरली मुलगी मानसी तर धाकटी मुलगी कीर्ती असे चौघांचे कुटुंब आहे. 

आर्थिक स्थिती नसल्याने त्यांनी मानसी हिला आजोळी कान्हापुरी (ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दाखल केले. पुढे आठवी ते दहावीचे शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथे तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण समावि अकलूज येथे तिने घेतले.

 अकलूज येथीलच रत्नाई कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी.ॲग्री केले तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम.एस्सी. ॲग्री केले आहे. या संपूर्ण शिक्षणाचा खर्च त्यांनी कष्ट करून उचलला आहे.

वडिलांच्या या कष्टाची आणि परिश्रमाची जाण ठेवत मानसीने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतून सहायक वनसंरक्षक वर्ग एक हे पद मिळविले आहे. या परीक्षेत ती राज्यात मुलींमध्ये दुसरी आलेली आहे.

शिक्षणासाठी आग्रही

मधुकर गोडसे यांना दोन मुलीच आहेत. मात्र मुली शिकल्या पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहिल्या पाहिजेत हे त्यांचे स्वप्न आहे. 

त्यानुसार मानसी हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहायक वनसंरक्षक वर्ग एक हे पद मिळविले आहे.तर दुसरी मुलगी कीर्ती बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे.

Post a Comment

0 Comments