google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अँड मा.शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात..

Breaking News

अँड मा.शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात..

अँड मा.शहाजीबापू पाटील यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे रविवारी सांगोल्यात..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला : सांगोला नगरपरिषद निवडणुकीत रंगत येवू लागली आहे. शिवसेना शिंदे गटाचे 

माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाच्या सर्व उमेदवारांचा प्रचार शुभारंभ रविवार 23 नोव्हेंबर रोजी होत असून 

या शुभारंभासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगोल्यात येत आहेत. शहाजीबापू यांच्याकडून याबाबत अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.

सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस हा 21 नोव्हेंबर आहे. 

आजतागायत शिवसेना पक्ष सोडला तर इतर कोणत्याही पक्षाकडून अधिकृतपणे प्रचाराचा शुभारंभ अजूनही करण्यात आलेला नाही. 

मागील दोन दिवसांपासूनच शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांनी आपापल्या प्रभागामध्ये होम टू होम जाऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. 

मात्र सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा एकत्रितपणे शुभारंभ सोहळा हा रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करून शहाजी बापू हे या निवडणुकीत प्रचाराचा धमाका उडवून देणार आहेत.

रविवार 23 रोजी सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. 

यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जंगी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सभेच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. 

प्रचार सभा यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने यांच्यासह त्यांचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसत आहेत.

नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सांगोल्यात आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उतरणार

 असल्यामुळे शहाजी बापूकडून ही निवडणूक चुरशीने लढवली जाण्याची शक्यता दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि 

माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे टीकेची राळ उडल्याचे दिसत आहे. 

अशातच एकनाथ शिंदे हे स्वतः या प्रचारासाठी येऊन जंगी सभा घेणार असल्यामुळे या सर्व वादावर ते नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments