शक्तीपीठ महामार्ग रद्द करा यासाठी बलवडी येथील शक्तीपीठ महामार्ग मोजणी रोखली..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी - बलवडी ता. सांगोला येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मंगळवारी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागले.
व या महामार्गासाठी आम्ही एक इंच ही जमीन देणार नाही एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देऊन मोजणी रोखली, शक्तीपीठ रद्द करा अशी शेतकऱ्यामार्फत मोजणी झालेल्या अधिकाऱ्यास ठणकावून सांगितले.
शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच सहा वेळा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले व शेतात प्रवेश दिला नाही व या अगोदर असलेल्या रत्नागिरी नागपूर या महामार्गास हा महामार्ग जोडा व नवीन महामार्गाची गरज नाही
व आमच्या बागायती जमिनी उध्वस्त करून शासन कोणाचा विकास करणार व एक इंच ही जमीन देणार नाही असे बाधित शेतकरी दादासो वाघमोडे यांनी सांगितले. तर पुन्हा पुन्हा मोजणी करण्यास येऊ नका असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
मोजणीस आमचा विरोध आहे असे सांगून शक्तीपीठ रद्द करा असे यावेळी शेतकरी दादासो वाघमोडे, सौ. शुभांगी वाघमोडे, तमा पाटील, संतोष पाटील,
सतीश पाटील, लक्ष्मण कवडे, गणेश शिंदे, वसंत चौगुले, शिवदास चौगुले, मधुकर चौगुले, सुजाता धायगुडे बसवेश्वर जोंधळे, सुनील चव्हाण, प्रमोद कवडे, पोपट गुरव, सुभाष गुरव,
अलका नाईक, दत्तात्रय पाटील विनायक चव्हाण, संतोष चव्हाण, रामचंद्र पाटील, सत्यभामा चव्हाण, विजय भुसारी, ऋषिकेश धायगुडे, प्रथमेश धायगुडे, प्रतिभा धायगुडे, विजया धायगुडे, राजाराम धायगुडे, बापूसो धायगुडे तुकाराम कुंभार,इत्यादी बाधित शेतकरी बांधव व भूमापन अधिकारी उपस्थित होते.
जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या व आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही व मोजणी करू नका अशी विनंती ही शेतकऱ्यामार्फत अधिकारी वर्गांना करण्यात आली.


0 Comments