शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना निष्ठा ,स्वाभिमान शिकवू नये--भाई चंद्रकांत सरतापे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे,९५०३४८७८१२)
गेले अनेक वर्षे सांगोल्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा आहेच.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शेकापक्षाने कायम सोबत काम केले आहे.
याचा अर्थ शेकापच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बदलला होता असा करता येत नाही. त्याकाळी सुध्दा शेकापक्षाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्य करायचे
व शेकापही त्यांना सहकार्य करीत असायचा त्यावेळेस दोंन्ही बाजुकडुन काही लोकांकडुन टिका सुध्दा व्हायची.
परंतु विकासाच्या मुद्यावर आंम्ही त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करीत होतो.
ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ शेकापचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात गेले असा होत नाही हे प्रथम समजून घ्या.
काळानुसार देशात व राज्याच्या राजकारणात अमुलाग्र बदल झालेला आहे.काॅग्रेसमधुन फुटुन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली होती
ते दोंन्ही पक्ष सुध्दा काही दिवसांनी पुंन्हा एकमेकांच्या सोबत आले आहेत.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपचे सरकार राज्यात यावे म्हणून सभागृहात गैरहजर राहुन भाजपला अनुकूल मदत केलेली आसल्याचे जनतेनी पाहीले आहे.
या पेक्षा वेगळा प्रकार म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोंन्ही पक्ष शिवसेनेसोबत एकत्रीत येऊन सत्ता स्थापन केली.
ही अनपेक्षीत आघाडी होती तरीही झालीच ना...अशी आघाडी व त्यातुन निर्माण झालेली सत्ता राज्याला अचंबित करणारी होती तरीही ते सरकार चालले
.काही दिवसांनी पुंन्हा राजकीय भुकंपाचे दोन जबरदस्त हादरे राज्याने अनुभवले शिवसेना व राष्ट्रवादी दोन वेगवेगळे पक्ष तयार झाले ..
या पक्षातुन एकमेकातुन विस्तव सुध्दा जात न्हवता ते आता काही ठिकाणी एकत्रीत आघाडी करताना दिसत आहेत....
काही ठिकाणी तर धक्कादायक रित्या दोंन्ही शिवसेना एकत्रीत येऊन भाजपाच्या विरोधात लढताना दिसतात.आशा अनेक युत्या
आघाड्या राज्यात निर्माण झाल्या असताना सांगोल्यात शेकापक्षाने कुठे एखादी आघाडी केली तर सगळ्यांना वाईट वाटायला लागले आहे,
आहो सांगोल्यात एका एका नेत्यांनी पाच- पाच ,सहा-सहा पक्ष बदलले आहेत
ते नेते सुध्दा शेकापक्षाला ज्ञान शिकवायला लागले तर ते थोडंसं हास्यास्पद होईल.भाजपच्या मदतीने अनेकजण राजयातु सत्ता उपभोगतात ते चालतंय.आमचा
सांगोल्यातील शेकापक्ष मतदार संघाच्या व शहराच्या विकासाठी व सर्वसामान्य जनतेच्या
समस्या सोडवण्यासाठी विकास निधी मिळवून जर विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी जर आघाडी केली
तर कोणाला वाईट वाटायचे काय कारण. शेकापक्षाचे नेते व लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी लोकांच्या साठी मतदार संघातील विकासाठी एक पाऊल मागे सरकले
तर काय हरकत. शेकापक्षाने केलेल्या आघाडी बाबत बोलणारांनी आधी सांगोला तालुक्यात या अगोदर केलेल्या
किळसवाण्या आघाड्या व युत्या लक्षात आणाव्यात मगच आमच्या आघाडीवर बोललेल बरं...
आमचे नेते लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांना आघाडी व युती करुन काय स्वताचा भला मोठा विकास करायचा नाही.
किंवा राजकारणाच्या माध्यमातून अमाप धन दौलत मिळवायची नाही निस्वार्थ पणे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणे
ही शेकापक्षाची परंपरा आहे.सांगोला शहरात झालेली आघाडी फक्त जनतेच्या कामाची सोडवणुक व्हावी म्हणून आहे.आंम्ही काय लपुन छपुन आघाडी केलेली नाही .फक्त नि फक्त विकासाच्या मुद्यावर शेकापक्ष आघाडीमध्ये सामील झालेला आहे .
काही विरोधक संभ्रम निर्माण करणार आहेत. ते त्यांचे काम आहे.
परंतु संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी आपली निष्ठा स्वाभिमान तपासावा व आपण एकाच पक्षाशी बांधील आहोत का?
याचा विचार करावा.आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचा हेतु साफ आहे
हे सर्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते कार्यकर्ते व मतदार जाणतात त्यांच्या कामावर विश्वास ठेवतात.
आमचा आघाडीमध्ये सामील होण्याचा हेतु फक्त शहराचा व तालुक्याच्या विकास असल्याचे शेकापक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले.


0 Comments