google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारच भाजपमध्ये

Breaking News

खळबळजनक...अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारच भाजपमध्ये

खळबळजनक...अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेकापचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारच भाजपमध्ये


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला - सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ठरवलेले

 नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच भारतीय जनता पक्षामध्ये ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उद्योजक बाळासाहेब एरंडे, श्रीकांत देशमुख तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना.जयकुमार गोरे म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे सुरू आहेत. 

त्याप्रमाणे सांगोला नगरीच्या विकासासाठी सहकार्य करून सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मोठ्या ताकतीने प्रयत्न करू तसेच निवडणुकीच्या संदर्भातील पुढील निर्णय तालुक्यातील नेतेमंडळी लवकरच जाहीर करतील. 

स्व. गणपतरावजी देशमुख यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले व सामाजिक वारसा असणारे तसेच सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध असणारे माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांचे मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करीत आहे

 असे शेवटी म्हणाले. सांगोला शहराच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच पुढील आघाडीची घोषणा होईल 

अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यानंतर दिली.

Post a Comment

0 Comments