महुद जिल्हा परिषदेसाठी बाळासाहेब ढाळे व महुद पं.स
गणासाठी सौ.सुवर्णाताई अशोक येडगे यांची निवडणु लढवण्याची तयारी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन,राज्यातील नगरपालीका व नरपंचायतीच्या निवडणुकीचा धडाका सुरू असताना
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राजकीय आभ्यासाकांच्या मते नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तनवन्यात येत आहे..
सांगोला तालुक्यातील बहुतांश गटातील नेते मंडळी चाचपणी करण्यासाठी मतदार संघातील गावोगावी जात असल्याचे पहावयास मिळत आहे..सांगोला तालुक्यातील
महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महुद बु!! गटांमध्ये विविध पक्षांचे नेते कामाला लागलेले असुन.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महुद जिल्हा परिषद गटातुन जिल्हा परीषदेसाठी महुद गावचे माजी सरपंच मा.बाळासाहेब महादेव ढाळे व महुद पंचायत समिती
गणासाठी सौ.सुवर्णाताई अशोक येडगे या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडणुक लढवण्याची तयारी करीत आहेत.
या दोंन्ही उमेदवारीला नागरीका मधुन सकारात्मक वातावरण पहावयास मिळत आहे.
मा.बाळासाहेब ढाळे हे गंगामाई दुध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून चांगले काम केले असुन मा.ढाळे यांनी महुद ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून चांगले काम केले आहे
त्यांच्याच कार्यकाळात कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन करण्यात आले असुन.त्याच्या मार्गदर्शनाखाली पाण्याची लोक चळवळ उभारण्यात आली होती.
त्यांच्या या कामाची पोच पावती म्हणुन त्यांना केंद्र सरकारचा राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते
तसेच महाराष्ट्र राज्याचा" लोकमत " आणि "बि.के.टी" टायर्स यांच्या वतीने सुध्दा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आसुन,
जिल्हा स्तरावरील पुरस्कार सुध्दा ढाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. आसे कर्तव्य दक्ष सरपंच
सध्या महुद जिल्हा परिषद गटातुन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेची निवडणुक लढवण्याची तयारी करीत आहेत...
महुद पंचायत समिती गणातुन महुद गावचे पुरोगामी युवक संघटनेचे आध्यक्ष अशोक येडगे यांच्या सुविद्य पत्नी
सौ.सुवर्णाताई आशोक येडगे यांनी महुद पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आसुन मा.आशोक येडगे यांनी
पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे.
आशोक येडगे यांनी पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीले आहेत.
तसेच मा. अशोक येडगे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते
तसेच सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असते.
आशा उपक्रमातुन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत येडगे यांचा संपर्क असुन त्याच्या सुविद्य पत्नी सौ.सुवर्णाताई अशोक येडगे यांचे नाव समोर
आल्याने महुद पंचायत समिती गणांमध्ये सौ.येडगे यांच्या उमेदवारीला महुद गणातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून
जिल्हा परिषदेला बाळासाहेब ढाळे व पंचायत समितीला सौ.सुवर्णाताई येडगे यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे.


0 Comments