खळबळजनक! प्रलंबित खटल्याचा निकाल बाजूने देण्यासाठी 15 लाख मागितले,
सत्र न्यायाधीशावर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई
प्रलंबित निकाल बाजूने लावण्यासाठी 15 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी माझगाव कोर्टातील
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिपिक चंद्रकांत वासुदेव याच्यामार्फत त्यांनी लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणी लिपिक चंद्रकांत वासुदेव याला लाचलुचपत विभागाने अटक करण्यात आली आहे.
न्यायालयतील प्रलंबित निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी तक्रारदाराकडे 25 लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या प्रकरणात माझगाव कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी, चंद्रकांत हनुमंत वासुदेव या लिपिकांविरोधात लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सापळा रचून रंगेहात पकडलं
या व्यवहारात चंद्रकांत वासुदेव याने स्वत:साठी 10 लाख तर अतिरिक्त सत्र न्यायाधीश काझी यांच्यासाठी 15 लाख रुपये मागितल्याचं समोर आलं आहे.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
चेंबूर येथे झालेल्या बैठकीत तडजोडीमध्ये शेवटी 15 लाख रुपये देण्याचं ठरलं. त्या अनुशंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि 15 लाखाची लाच घेताना चंद्रकांत वासुदेव याला रंगेहात पकडले.
पैसे स्वीकारल्यानंतर चंद्रकांत वासुदेव याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्याशी संपर्क केला आणि लाचेची रक्कम ताब्यात घेतल्याचं सांगितले.
त्याला न्यायाधीश काझी यांनीही संमत्ती दर्शवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहे.
दोन कोटींच्या लाच प्रकरणी उपनिरीक्षकाला अटक
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2 नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय 44, रा. सोपान रेसिडेन्सी, गंगोत्री पार्क, दिघी रोड, भोसरी; मूळ रा. कर्जुले हरियाळ, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) असे या आरोपी उपनिरीक्षकाचे नाव आहे.
चिंतामणी हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची लाच मागितली होती, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.


0 Comments