google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाची संवेदनशील योजना — गंभीर आजारांवर १ लाख रुपयांपर्यंत मदत

Breaking News

पत्रकारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाची संवेदनशील योजना — गंभीर आजारांवर १ लाख रुपयांपर्यंत मदत

पत्रकारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाची संवेदनशील योजना — गंभीर आजारांवर १ लाख रुपयांपर्यंत मदत


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारांसाठी “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” ही योजना राबविण्यात येत असून, राज्य शासनाकडून अधिस्वीकृती धारक पत्रकारांना गंभीर आजार, अपघात अथवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते.

ही योजना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई आणि विभागीय माहिती कार्यालय, पुणे यांच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आली

 आहे. पत्रकारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी शासनाने ठराविक आजारांनुसार आर्थिक मदतीच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत.

आजाराचे नाव आर्थिक मदतीची कमाल मर्यादा

*1 हृदय शस्त्रक्रिया (Heart Surgery) ₹1,00,000/-*

*2 . हृदय बायपास सर्जरी (Bye Pass Surgery) ₹1,00,000/-*

*3 .अँजिओप्लास्टी (Angioplasty) ₹1,00,000/-*

*4 . रक्त अथवा इतर प्रकारचा कॅन्सर (Blood/Other Cancer) ₹1,00,000/-*

*5 . सांधा प्रत्यारोपण (Joint Replacement) ₹1,00,000/-*

*6 . मेंदूविकार / ब्रेन हॅमरेज / लकवा (Cerebral Vascular CV) ₹1,00,000/-*

*7 . हृदयविकाराचा झटका (Cardiac Emergency) ₹1,00,000/-*

*8 . डायालिसिस (Dialysis) ₹40,000/-*

*9 . मेंदूतील ट्युमर (Brain Tumor) ₹40,000/-*

*10 . अपघाती भाजणे (Accidental Burns) ₹40,000/-*

*11 . मूत्रपिंड विकार (Kidney Disease) ₹40,000/-*

*12 . डोळ्यांतील पडदा सुटणे (Retinal Detachment) ₹40,000/-*

*13 . पोटातील व इतर अवयवांतील गंभीर आजार ₹40,000/-*

*14. रक्तदाब, मधुमेह व तत्सम आजार ₹40,000/-*

या योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती प्राप्त पत्रकार, स्वतंत्र पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओ पत्रकार, संपादक तसेच त्यांचे पती / पत्नी आणि अल्पवयीन मुलांना मिळू शकतो.

उपचारासंबंधी कागदपत्रे, वैद्यकीय अहवाल व बिलांसह संबंधित विभागीय माहिती कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो.

या योजनेसंदर्भात शासनाने विविध कालावधीत आदेश जारी केले आहेत.

प्रमुख शासन निर्णय क्रमांक –

*मा.महा. 2011/प्र.क्र. 322/38, दि. 17 ऑक्टोबर 2011*

*मा.महा. 2013/प्र.क्र. 646/38, दि. 9 ऑक्टोबर 2013*

*मा.महा. 2016/प्र.क्र. 248/38, दि. 11 ऑगस्ट 2016*

*मा.महा. 2018/प्र.क्र. 248/38, दि. 11 जून 2018*

अधिक माहिती व अर्जासाठी संकेतस्थळ: https://dgipr.maharashtra.gov.in

👉 https://maharashtra.gov.in

पत्रकार हे समाजाचे डोळे व कान आहेत. जनतेच्या समस्या मांडताना, विविध घटनांवर काम करताना त्यांच्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरते.

 हे लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली असून, पत्रकारांच्या कुटुंबाला संकटाच्या काळात दिलासा मिळावा हा तिचा उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments