महुदच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नवनाथ सरगर यांची निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक पैलवान नवनाथ सरगर यांची महुदच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड संपन्न झाली.
महुद गावच्या सरपंच सौ.संजिवनी कल्याण लुबाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.व सरगर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
मा.नवनाथ सरगर यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये नाव लौकीक मिळवलेला असुन.सध्या ते कुस्ती क्षेत्रामधील नवीन तरुणांना मार्गदर्शन करीत आहेत.
मा.नवनाथ सरगर हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असुन त्यांना समाजीक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे.त्यांच्या या सुस्वभावाने ते अनेक तरुणांशी जोडले गेले आहेत.
त्यांच्या या निवडीने महुद गावातील विविध प्रकारचे तंटे योग्य प्रकारे मिटविले जातील व गावातील समाजीक सलोखा राखण्यासाठी त्यांच्या या निवडीचा नक्कीच फायदा होईल.
मा.नवनाथ सरगर यांच्या निवडीने महुद गावातील सर्व तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले आहे.नवनाथ सरगर यांची निवड झाल्यानंतर अनेक मांन्यवर नेत्यांनी त्यांचा सत्कार केला.
अनेक मंडळांनी व युवकांनी या निवडीचे स्वागत फटाके फोडुन व गुलाल उधळून केले.सरगर यांच्या निवडीने महुद गावातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले.
या निवडीच्या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.ग्रामविस्तार अधिकारी मा.शिदे यांनी आभार मानुन ग्रामसभेची सांगता करण्यात आली.


0 Comments