google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडणार: १० ऑक्टोबर रोजी ‘या’ कट्टर समर्थकाचा होणार भाजप प्रवेश

Breaking News

सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडणार: १० ऑक्टोबर रोजी ‘या’ कट्टर समर्थकाचा होणार भाजप प्रवेश

सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पडणार: १० ऑक्टोबर रोजी ‘या’ कट्टर समर्थकाचा होणार भाजप प्रवेश


दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले बाळासाहेब एरंडे यांचा भाजप प्रवेश निश्चित

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९६०३४८७८१२)

सांगोला : महाराष्ट्रामध्ये सांगोला मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा आज पर्यंत बालेकिल्ला मानला जात आहे 

या बालेकिल्लातील शेकापचे अनेक मातब्बर नेते १० ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे

शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख आणि सध्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले व शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

बाळासाहेब एरंडे यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीमध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.

शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, येत्या दहा ऑक्टोबर रोजी हा पक्ष प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे 

यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी हा शेकपसाठी मोठा धक्का मानला जात आहेत.

Post a Comment

0 Comments