स्थानिक स्वराज्य निवडणुका लवकरच; राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार असून, राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे.
यामध्ये विविध प्रवर्गानुसार पदांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे.
या आरक्षण सोडतीनुसार, राज्यातील ६७ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी ३४ नगराध्यक्षपदे ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. याशिवाय, एकूण ७४ नगराध्यक्षपदे राखीव ठेवण्यात आली
असून, त्यापैकी ३८ जागा सर्वसाधारण महिला, ७ जागा अनुसूचित जमाती, २० जागा मागास प्रवर्ग, तर उर्वरित जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या यादीनुसार, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव नगरपरिषदांमध्ये तिरोडा, वाशिम, धामणगाव, भोकरदन, भद्रावती, परांडा, भगूर, मालवण, नंदुरबार, खापा, वरोरा, हिंगोली, मोर्शी, शहादा,
उमरेड, नवापूर, त्र्यंबक, कोपरगाव, हिवरखेड, बाळापूर, शिरूर, कुलगाव-बदलापूर, मंगळूरपीर, पाथर्डी, देगलूर, धाराशिव, इगतपुरी, रामटेक, माजलगाव,
पालघर, मलकापूर, इस्लामपूर, जुन्नर, कुरडुवाडी, औसा, महाड, अकोट, चोपडा, सटाणा, गोंदिया, सांगोला, दौंड, राहाता, रोहा, देसाईगंज, येवला, कर्जत, कंधार, शिरपूर इत्यादींचा समावेश आहे.
त्यापैकी ३४ नगरपरिषदांमध्ये महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. भगूर, इगतपुरी, विटा, बल्हारपूर, धाराशिव, भोकरदन, जुन्नर, उमरेड, दौंड, कुलगाव-बदलापूर, हिंगोली, मुरुड-जंजिरा, शिरूर, काटोल, माजलगाव, मूल, मालवण, देसाईगंज, हिवरखेड, अकोट,
मोर्शी, नेर-नवाबपूर, औसा, कर्जत, देगलूर, चोपडा, सटाणा, दोंडाईचा-वरवडे, बाळापूर, रोहा, कुरडुवाडी, धामणगाव रेल्वे, वरोरा या नगरपरिषदांमध्ये ओबीसी महिला प्रवर्ग आरक्षित ठेवण्यात आला आहे.
तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ३८ नगरपरिषदांमध्ये पदे आरक्षित आहेत. यामध्ये मोहाडी, बार्शीटाकळी, वाशी, गुहागर, राळेगाव, वैराग, महादुला, पेठ, पाटण,
औढा नागनाथ, रेणापूर, म्हसळा, दिंडोरी, लोणंद, देवरुख, वडगाव मावळ, पारशिवनी, शहापूर, देहू, कुही, मुक्ताईनगर, बाभुळगाव आदींचा समावेश आहे.
निवडणुका जाहीर होण्याची औपचारिक घोषणा काही दिवसांत अपेक्षित असून, आरक्षण प्रक्रियेनंतर आता उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.


0 Comments