मोठी बातमी..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेशी इतर पक्षांनी युती केल्यास आमची तयारी
,अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवण्याची मा.आम.अॅड. शहाजीबापू पाटील यांची तयारी पुर्ण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आता पर्यंतच्या सर्व निवडणुकीत परिणामाचा व पराभवाचा विचार न करता जनतेसाठी लढणारा पक्ष म्हणजेच शिवसेना : सांगोला शिवसेना विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, मा. नगरसेवक प्रा. संजय देशमुख
सांगोला/प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत फक्त घोषणा बाकी आहेत.
इच्छुक उमेदवार निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत मा.आमदार शहाजीबापू पाटील यांनी कधीही पराभव व परिणांचा विचार न करता विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या आहेत.
चालू निवडणुकीमध्ये शिवसेना इतर पक्षाला बरोबर घेवून जावून निवडणुक लढविण्याच्या तयारीत आहेत. जर इतर पक्षांनी युतीला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास शिवसेना कोणत्याही परिस्थितीत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार असून सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर उमेदवारांची तयारी झाली
असून या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू असे विचार सांगोला नगरपरिषदेचे मा.नगरसेवक व सांगोला शिवसेना विधानसभा मतदार संघाचे प्रमुख प्रा.संजय देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
1990 पासून अॅड. शहाजीबापू पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला.माजी आम. शहाजीबापू पाटील व स्व. सुभाषनाना पाटील यांनी निवडणुकीतील यश -अपयश याचा विचार न करता
मोठ्या धैर्याने व समर्थपणे कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या पाठबळावरती विधानसभेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका पार पडल्या. बापू व नानांनी तालुक्याच्या विकासासाठी व शेतीच्या पाण्यासाठी राजकीय चळवळ व लढा उभारला.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चळवळ उभा करून अनेक निवडणुका पार पाडल्या. यावेळी त्यांनी पराभवाचा कोणताही विचार केला नाही. या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय वंचितांना न्याय देण्याचा लढा
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या 40 वर्षापासून चालू ठेवला आहे. आमची पार्टी म्हणजे आमचे कुटुंबच आहे. पराभवाचा विचार बापू व नानांनी कधीच केला नाही. आमचा परिवार देखील निवडणुकीमध्ये परिणामाची चिंता करत नाही व कार्यकर्तेही करत नाहीत.
सांगोला पंचायत समितीत निर्विवाद बहुमत असताना देखील सागरदादा पाटील यांनी तत्कालीन सभापतींच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
पराभवाचा व परिणामाचा विचार नेतेच करीत नाहीत तर कार्यकर्ते तर अजिबात करीत नाहीत. आमच्या पक्षाची जडणघडण मुळात शोषित, वंचित, दलित, पीडित यांना न्याय देण्यासाठी झाली
असून क्रांतिकारी अॅड.शहाजीबापू पाटील यांच्या परिवारात आहे. आमचा परिवार हा फक्त आमच्या कुटूंबापुरता नसून आमच्या विचारांची बांधिलकी जपणारा सर्व जाती-धर्माचा नागरिक हा आमच्या परिवाराचा सदस्य आहे.
सांगोला तालुक्यात राजकारण करताना मा.आम. अॅड. शहाजीबापू पाटील यांनी जातीपातीचा कधीच विचार केला नाही.
2016 च्या नगरपालिका निवडणुकीत पाच पक्षांची महायुती करून नगरपालिका निवडणुक लढवण्यात आली होती. या निवडणुकीत आठ नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष पद महायुतीने मिळवले होते.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आम. शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेशी इतर पक्षांनी युती करावी अशी भूमिका मांडली आहे. युती करण्यासाठी जे पक्ष सोबत येतील त्यांना सोबत घेतले जाईल. कोणी सोबत आले
तरी ठीक अन्यथा नगरपालिका निवडणुका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची आम. शहाजीबापू पाटील यांची तयारी असल्याचे सांगोला शिवसेना विधानसभा मतदार संघाचे प्रमुखव माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख यांनी सांगितले की, निवडणुकीत पराभवाचा व परिणामाचा विचार न करणारा पक्ष म्हणजेच शिवसेना असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे
माजी आम.शहाजीबापू पाटील हे सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करीत आहेत. नगरपालिका निवडणुकीसाठी 24, पंचायत समिती निवडणूकीसाठी 14 ,जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 जागेसाठी उमेदवारांची यादी
पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबईतील बैठकीत देण्यात आली आहे. कोणी बरोबर आलं तरी ठीक आहे. सन्मानपूर्वक युती केल्यास स्वागत आहे. बरोबर कोणी येण्यास तयार नसल्यास स्वबळावर लढायला तयार असणारा आमचा शिवसेना पक्ष आहे.
निवडणुकीत मोठे मताधिक्य देणारी गावे व पिछाडी देणारी गावे यामध्ये दुजाभाव न करता सर्वांना सारखा न्याय देणारे नेते मा.आम. शहाजीबापू पाटील हे आहेत. बापूंनी कधीच दुजाभाव केला नाही . 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील निवडून
आल्यावर केवळ शिवसेना पक्षापुरते मर्यादित न राहता मी आता सांगोला विधानसभा मतदार संघाचा आमदार आहे. म्हणून मतदार संघात सर्वांना बरोबर घेवून काम केले.सर्व वंचित गावांना विकासामध्ये समाविष्ठ करण्यासाठी प्रचंड मोठा निधी मतदार संघात खेचून आणण्याचे काम अॅड.शहाजीबापूंनी केले.
यश -अपयश याचा विचार न करता तालुक्याच्या विकासासाठी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख यांनी सांगितले.
तालुक्याचे नेते स्व. आम भाई गणपतराव देशमुख हे माझे विरोधक नसून सांगोल्याचा दुष्काळ माझा विरोधक आहे म्हणून गेली 40 वर्षे काम करणारे नेते म्हणजे शहाजीबापू पाटील हे होत. परिस्थितीच्या विरोधात लढून दुष्काळ हटवण्याचा ध्यास घेणारे नेते शहाजीबापू पाटील हे होत.
परिस्थितीच्या विरोधात केवळ तालुक्याच्या विकासासाठी लढणारे, प्रचंड टीका करणारे व्यक्तिमत्व, निवडणुकीत पद गेले म्हणून कधी दुजाभाव केला नाही. मोठे अंतकरण असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मा. आम. अॅड. शहाजीबापू पाटील हे होत.


0 Comments