google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा 'आसूड मेळावा'; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

Breaking News

जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा 'आसूड मेळावा'; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा 'आसूड मेळावा'; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल


सांगोला : केंद्र सरकारने विविध पिकांना हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत.

 पंजाबचा शेतकरी भावासाठी लढतो, मग शिवरायांच्या महाराष्ट्रातील शेतकरी गप्प का आहे?

असा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय देश कधीही सुखी होऊ शकणार नाही असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

घेरडी (ता. सांगोला) येथे आयोजित शेतकरी 'आसूड मेळाव्यात' माजी आमदार बच्चू कडू बोलत होते. या मेळाव्यासाठी माजी आमदार बच्चू कडू, माजी मंत्री महादेव जानकर, 

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील तसेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली.

बच्चू कडू म्हणाले, आज जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला आहे. आम्हाला योग्य भाव मिळाला, तर आरक्षण नको, आम्ही स्वतः नोकऱ्या देऊ शकतो इतकी ताकद आमच्यात आहे.

माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, बच्चू भाऊ आणि मी फकीर आहोत. आम्ही सत्तेसाठी नव्हे तर गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो. बच्चू कडू, राजू शेट्टी

 आणि आम्ही मिळून सत्ताधाऱ्यांची २४ टक्के मते कमी करू शकतो. मुख्यमंत्री व्हायला एवढीच मते लागतात. आता आमची भूमिका एकच 'ईव्हीएम हटवा, देश बचावा'.

एकजुटीने लढण्याचे आवाहन

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, शेतकरी हितासाठी आम्ही 'किसान रेल्वे' सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. परंतु सध्याचे सरकार शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसासाठी नव्हे

 तर उद्योगपती व कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करत

 शेतकऱ्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सांगोला तालुक्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments