सांगोला तालुक्याचे युवा नेते मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/ प्रतिनिधी- ३ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्याचे युवा नेते शेतकरी कामगार पक्षाची तोफ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख
यांच्या वाढदिवसनिमित्त हार तुरे न स्विकारता सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सिना नदीच्या काठी आलेल्या पुरामुळे उध्वस्थ झालेल्या
कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू गव्हु, तांदूळ, ज्वारी इत्यादी साहित्य जमा करण्यात आले. व ते साहित्य प्रशासकीय यंत्रणेमार्फत पुरग्रस्थांना वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसाचे औचित्य साधून लहान मुलांना खाऊ वाटप करून व सामाजिक भान ठेवून सामाजिक वनिकरण विभाग व डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख प्रेमी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वृक्षा रोपण करण्यात आले.
तसेच मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त अनेक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष
भेटून पूरग्रस्तांनासाठी छोटी छोटी मदत जमा करून सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला. तसेच अनेक कार्यकर्ते यांनी फोन द्वारे, व्हाट्सअप द्वारे मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रभर अनेक कार्यकर्ते यांनी दिवसभर आपापल्या परीने पुरग्रस्थांच्यासाठी छोटी छोटी भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.


0 Comments