google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली; पतीचे हातपाय बांधून केले अपहरण सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक..पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली; पतीचे हातपाय बांधून केले अपहरण सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक..पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली;


पतीचे हातपाय बांधून केले अपहरण सांगोला तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : आर्थिक व्यवहारातून तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करून पती पत्नीला काठीने मारहाण केली, तसेच त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे हातपाय बांधून जबरदस्तीने अपहरण केले.

ही घटना गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद येथे एका हॉटेलसमोर घडली. याबाबत काजल दत्ता माने (रा.महूद, ढाळेवाडी, ता. सांगोला) 

यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संग्राम महादेव गिड्डे, राजेश गिड्डे व शबप्पा गिड्डे (तिघेही रा.सापटणे, ता. माढा) यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी काजल माने यांचे पती दत्ता संजय माने याने ऊस तोडणी

मशिनवर कामाला ऑपरेटर देतो, म्हणून संग्राम गिड्डे, राजेश गिड्डे व बप्पा गिड्डे (तिघेही रा. सापटणे ता. माढा) यांच्याकडून पैसे घेतले होते. 

ते पैसे परत करण्याच्या व्यवहारातून फिर्यादीचे पती दत्ता माने यास ते तिघेजण घेऊन जात असताना तिने त्यांना तुम्ही पतीला कोठे घेऊन चालला आहात, अशी विचारणा केली.

यांनी त्यावेळी बप्पा गिड्डे फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पती दत्ता यास शिवीगाळ, दमदाटी करून बप्पा गिड्डे यांनी हाताने व काठीने फिर्यादीच्या उजव्या

 हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली. तिघांनी पती-पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून पतीचे दोरीने हातपाय बांधून त्याचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments