google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धक्कादायक प्रकार माळवद कोसळल्याने झोपेतील महिलेचा मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील धक्कादायक प्रकार माळवद कोसळल्याने झोपेतील महिलेचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील धक्कादायक प्रकार माळवद कोसळल्याने झोपेतील महिलेचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला घराचे माळवद अंगावर कोसळून झोपेत असलेल्या ४२ वर्षीय महिलेचा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने जागीच मृत्यू झाला.

 ही घटना शुक्रवारी (दि. १०) पहाटे पाचच्या सुमारास घेरडी (ता. सांगोला) येथे घडली. सुरेखा प्रभाकर जगधने असे मृत महिलेचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार संतोष कणसे यांना फोन

करून माहिती दिली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. सुरेखा जगधने ही महिला तिच्या माळवदच्या राहत्या घरात झोपली होती; 

तर वडील आणि भाऊ घराबाहेर झोपले होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक माळवदासह दगडी भिंत तिच्या अंगावर पडून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

दरम्यान, माळवद ढासळल्याचा आवाजाने पिता-पुत्रांनी दरवाजा उघडून, आत पाहून आरडाओरडा केला. जमलेल्या पाच-सहा जणांनी मिळून

 खोऱ्याच्या साहाय्याने ढिगाऱ्याखालून काढून जखमी अवस्थेत सुरेखा हिला सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments