ब्रेकिंग न्यूज..नाझरे, वझरे येथील माण नदीतून रात्रभर जोमाने वाळू उपसा सुरू.. संबंधिताचे याकडे दुर्लक्ष
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला प्रतिनिधी नाझरे, वझरे येथील मान नदीपात्रातून रात्रभर ट्रॅक्टर, जीप, पिक अपने जोमाने वाळू उपसा सुरू असून, नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत व त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, पाण्याची पातळी खोल जात आहे
व संबंधिताचे याकडे अधिकच दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे तरी याकडे कोण लक्ष देणार असे नागरिकात बोलले जात असून, वाळू उपसा बंद करा अशी मागणी प्रकाश पाटील यांनी केली आहे.
बेघरासाठी शासनाचे धोरण वाळू देण्याचे असून त्यांना वेळेवर वाळू मिळत नाही व वाळू माफियांना वाळू मिळते व येथील वाळू मिरज, सांगली, सोलापूर येथे जात
असल्याने वाळू माफिया जोमात तर प्रशासन कोमात अशी परिस्थिती झाली आहे व यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. माढा तालुक्यातील मुरूम प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली
मग इकडे बेकायदेशीर वाळू उपसा होत असून कारवाई कोण कोणावर करणार व वाळू उपसा कधी थांबणार अशी नागरिकात बोलले जात आहे, वाळू उपसा न थांबल्यास नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
येथील महसूल कर्मचारी यांनी सध्या गावात राहणे गरजेचे आहे व त्यामुळे येथील परिस्थिती समजेल व वाळू उपसा बंद होईल तरी याकडे लक्ष देऊन अधिकारी वर्ग गावात राहावा अशी नागरिकात बोलले जात आहे.
माढा तालुक्यात मुरूम व वाळू उपसा याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला तसाच येथील पण घ्यावा असे नागरिकात बोलले जात आहे.
वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत त्या जबाबदार कोण१. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.



0 Comments