सांगोला तालुक्यात मंडल अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय बांधण्यासाठी निधी मिळावा
आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला: सर्वसामान्य नागरिकांसह शेतकर्यांची कामे सुरळीत व्हावी व कर्मचार्यांनाही कामे करताना अडचण येऊ नये यासाठी सांगोला विधान सभा मतदार संघातील गावासाठी
७ मंडल अधिकारी कार्यालय आणि ३२ तलाठी कार्यालय बांधण्यासाठी महसूल मंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निधीची मागणी केली असल्याची माहिती आम.भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी काल मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. रस्ते,पाणी, वीज या समस्यांबरोबरच
दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी बारीक लक्ष दिले असून यावेळी त्यांनी दुर्लक्षित असलेल्या सांगोला तालुक्यातील तलाठी कार्यालय व मंडळ कार्यालय बांधण्यासाठी निधीची मागणी केली.
सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये आजही तलाठी व मंडळ कार्यालयांसाठी स्वताच्या मालकीची इमारत नाही. आतापर्यंत ही कार्यालये गावातील ग्रामपंचायत, सामाजिक सभागृह, मंदिर किंवा गावातील खाजगी इमारतीत सुरु होती.
महसूल विभागाची कामेही आता ऑनलाईन प्रणालीतून होऊ लागली आहेत. स्वताची इमारत नसल्याने ऑनलाईन कामे करतांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिणामी महसूल कर्मचार्यांसोबत शेतकर्यांची गैरसोय होते.
त्यामुळे सुसज्ज तलाठी कार्यालय आणि मंडळ कार्यालये असावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून अनेकवेळा आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या कडे केली जात होती.
या मागणीचा गांभीर्याने विचार करुन आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नवीन तलाठी व मंडळ कार्यालय बांधकामासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निधीची मागणी केली आहे.
नूतन मंडळ कार्यालय आणि तलाठी कार्यालय इमारतींच्या बांधकाम झाल्यास सांगोला तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची गैरसोय दूर होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर निधीची तरतूद करणार असल्याचे आश्वासन दिले.


0 Comments