google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ग्रामदैवत श्री अंबिका देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

Breaking News

सांगोला ग्रामदैवत श्री अंबिका देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

सांगोला ग्रामदैवत श्री अंबिका देवी नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / करण मोरे:  सांगोला शहराचे ग्रामदैवत श्री अंबिका देवी देवस्थान तसेच श्री तुळजाभवानी जुने मंदिर येथे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक भक्तिभावाने साजरा होणार आहे. 

यासाठी देवस्थान समितीकडून धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांची सविस्तर कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली असून, सांगोलाभरातून व परिसरातील हजारो भाविक या उत्सवात सहभागी होणार आहेत.

उत्सवात दररोज पहाटे ३ ते ६ धार्मिक उपासना, दुपारी १२ ते २ अलंकार पूजा, सायंकाळी ४ ते ६ विविध भजनी मंडळांचे सादरीकरण, तसेच रात्री ७ ते १० दरम्यान गोंधळगीत, आरती व छबिना अशा कार्यक्रमांचा समावेश असेल.

मुख्य कार्यक्रमांची रूपरेषा

🔹 २२ सप्टेंबर (सोमवार) – उपासना आरतीसह घटस्थापना सोहळा पार पडणार असून देवी कलशावर विराजमान होईल. यावेळी श्री बसवेश्वर व श्री दत्त भजनी मंडळांचे सादरीकरण होणार आहे.

🔹 २३ सप्टेंबर (मंगळवार) – अभिषेक, भोगीपूजा, आरतीनंतर कोल्हापूर श्री महालक्ष्मी अवतार दर्शन. वाघ्या-मुरळी कार्यक्रम (श्री मोहन शिर्के) आणि विठ्ठल-यमाई भजनी मंडळांचे सादरीकरण.

🔹 २४ सप्टेंबर (बुधवार) – अभिषेक व आरतीनंतर देवीची बैलगाडी मध्ये विराजमान. श्री साई व ब्रम्हचैतन्य भजनी मंडळांचे सादरीकरण तसेच पांडुरंग पुसावळे यांचा देवी गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

🔹 २५ सप्टेंबर (गुरुवार) – हत्तीवरील देवी अलंकार दर्शन होणार असून रुद्र व विठ्ठल भजनी मंडळ तसेच करण बनकर यांचे गोंधळी गीत सादर केले जाणार आहे.

🔹 २६ सप्टेंबर (शुक्रवार) – देवीची नित्योपचार पूजा, आरती, महासरस्वती अलंकार पूजन, गुरुमाऊली भजनी मंडळाचे सादरीकरण व गोंधळी गीत.

🔹 २७ सप्टेंबर (शनिवार) – महाकाली अवतार पूजा, कुंकुमार्चन, श्रीराम भजनी मंडळाचे गोंधळी गीत व छबिना.

🔹 २८ सप्टेंबर (रविवार) – देवीची नित्योपचार पूजा व आरती, विन्ध्येश्वरी अलंकार पूजा, जय भवानी व श्री स्वरा भजनी मंडळांचे सादरीकरण.

🔹 २९ सप्टेंबर (सोमवार) – अभिषेक व आरतीनंतर नटराज अलंकार पूजन, समर्थ भजनी मंडळाचे गोंधळी गीत.

🔹 ३० सप्टेंबर (मंगळवार – महाष्टमी) – महत्त्वाचा दिवस. सिंहासन पूजा, महिषासुरमर्दिनी अलंकार पूजन तसेच देवी पानपूजा होईल. रात्री १० वाजता आरती आणि रात्री १२ वाजता भव्य होमहवन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

🔹 १ ऑक्टोबर (बुधवार) –माता अन्नपूर्णा अलंकार पूजन, पानपूजा व छबिन्यासह भक्तांसाठी विशेष धार्मिक वातावरण.

🔹 २ ऑक्टोबर (गुरुवार) – अश्वरूढ अलंकार पूजन, सायं ५ वा. आरती, रात्री सीमोल्लंघन कार्यक्रम व मध्यरात्री मंचकी निद्रा सोहळा पार पडेल.

🔹 ६ ऑक्टोबर (सोमवार – कोजागिरी पौर्णिमा) – पहाटे ४ वा. भूपाळी, अभिषेक, आरती. रात्री ८ वाजता आरतीनंतर दुधाचा प्रसाद वाटप.

🔹 ८ ऑक्टोबर (बुधवार) – भक्तांच्या उत्साहात व गजरात श्री अंबिका देवी पालखी सोहळा निघणार असून या सोहळ्याने नवरात्र उत्सवाची सांगता होईल.

भक्तीमय वातावरणाची मेजवानी

या संपूर्ण कालावधीत सांगोला शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. देवीच्या विविध अलंकारातील दर्शनामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभते. 

पारंपरिक भजनी मंडळांचे सुमधुर भजन, गोंधळगीत, कीर्तन व छबिना यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे आणि उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळते.

 सांगोला ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा नवरात्र उत्सव ही शतकानुशतकांची परंपरा असून, यंदाही या उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments