बेताल वक्तव्य करणाऱ्या आ. गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा
सांगोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या
एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे.
सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याची संस्कृती पायदळी तुडवणाऱ्या भाजप सरकारमधील आम. गोपिचंद पडळकर यांच्या आमदारकीचा
राजिनामा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ घ्यावा व महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृत राखण्यासाठी अशा माणसाला सभाग्रहात
येण्यास मज्जाव करावा, केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ गंभीर दखल घेऊन शासनास कळवावे,
या वरही अशी बेताल वक्तव्य केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेधार्थ महाराष्ट्रभर तिव्र पडसाद उमटतील याची नोंद घ्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष श्री. दत्तात्रय सावंत व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments