कोल्हापूर– कलबुर्गी एक्सप्रेस गाडीचे बुकिंग मंगळवारपासून.शहीद अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) रेल्वे क्रमांक 01451 & 01452 कोल्हापूर –कलबुर्गी –कोल्हापूर हि रेल्वे दि.24 सप्टेंबर पासून सकाळच्या सत्रात शुक्रवार वगळता धावणार आहे.
शहीद अशोक कामटे संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे सदरची रेल्वे सुरू होणार असल्याने प्रवाशात आनंदाचे वातावरण आहे . सांगोल्यातील प्रवाशांना सोलापूर येथून जाण्या व येण्याकरीता ही रेल्वे फार सोईस्कर होणार आहे.
या गाडीस सहा स्लीपर, चार थ्री टियर एसी व सहा जनरल कोच असल्याने या गाडीचे बुकींग दि.16 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. गाडी कोल्हापूर ते कुर्डूवाडी दरम्यान सर्व रेल्वे स्थानकावर थांबेल
तरी सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवहान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केले आहे. परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे कलबुर्गीहून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटानि सुटेल .
कोल्हापूर येथे उच्च न्यायालयात कामकाजासाठी जाणाऱ्यांना या गाडीचा फायदा होईल, कारण ही गाडी कोल्हापुरात पहाटे पोहोचेल.
या गाडीस हातकणंगले, जयसिंगपूर ,मिरज, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ,लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, जवळा, वासूद ,सांगोला ,पंढरपूर ,मोडनिंब, कुर्डूवाडी ,
सोलापूर असे थांबे असतील. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले असल्याने त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वकिलांना ये–जा करणे सोपे होईल.
सदर रेल्वे सुरू करण्याकरता माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रणितीताई शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार –सावंत, जनरल मॅनेजर धर्मवीर मीना,
विभागीय रेल्वे व्यवस्थापक , तिन्ही जिल्ह्यातील सर्व रेल्वे प्रवासी संघटना ,यांनी सततचा पाठपुरावा केल्याने ही मागणी पूर्णत्वास आली त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
चौकट:–सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापुरातून सोलापूर,कलबुर्गी रेल्वे सुरू करावी याकरिता अनेक दिवसापासून पाठपुरावा सुरू होता त्यास सर्वांच्या प्रयत्नाने यश मिळाले आहे.
या गाडीस माढा, मोहोळ, अक्कलकोट रोड, दुधनी, गाणगापूर रोड या ठिकाणी थांबा देण्यात यावा यासाठी संघटनेने मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे.
या मागणीस रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक दुजोरा मिळाल्याचेही सांगण्यात आले. तरीही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहण्याकरिता प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा.
निलकंठ शिंदे सर,अध्यक्ष :–शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना, सांगोला


0 Comments