google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिकमहूद येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा ग्रामसभेच्या शुभारंभाने करण्यात आला.

Breaking News

चिकमहूद येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा ग्रामसभेच्या शुभारंभाने करण्यात आला.

चिकमहूद येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज




अभियानाचा ग्रामसभेच्या शुभारंभाने करण्यात आला.


वार - बुधवार दि. 17/09/2025

सांगोला – चिकमहूद ता. सांगोला येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून सुरुवात करून स्पर्धेच्या

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.शोभाताई सुरेश कदम होत्या. सुरुवातीस सांगोला पंचायत समितीचे अधिकारी तथा या अभियानाचे चिकमहूद पालक अधिकारी श्रीमती.प्रतिभा अमोल पवार मॅडम यांनी प्रास्ताविक करून

 अभियाना विषयीची माहिती दिली. त्यानंतर चिकमहूदचे तलाठी आप्पासाहेब काळेल  व ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्पर्धात्मक अभियान कशा पद्धतीने राबवायचे याविषयी मार्गदर्शन

केले. यानंतर उपसरपंच तुषार भोसले यांनी आपल्या मनोगतातून या अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच श्रीमती. शोभाताई सुरेश कदम यांनी  केले.या ग्रामसभेला गावातील

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून राज्य पातळीवरील पारितोषिक मिळवण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, 

विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला आरोग्य सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,महिला बचत गटातील सर्व अध्यक्ष व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, विविध स्तरातील अधिकारी,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 नागरिकांनी या अभियानामध्ये आपला उत्फुर्त सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments