google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात सेवा पंधरवडा अभियानातंर्गत मौजे धायटी येथे दिनांक १८.०९.२०२५ रोजी नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या ६१ जात प्रमाणपत्राचे वाटप

Breaking News

सांगोला तालुक्यात सेवा पंधरवडा अभियानातंर्गत मौजे धायटी येथे दिनांक १८.०९.२०२५ रोजी नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या ६१ जात प्रमाणपत्राचे वाटप

सांगोला तालुक्यात सेवा पंधरवडा अभियानातंर्गत मौजे धायटी येथे दिनांक १८.०९.२०२५



रोजी नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या ६१ जात प्रमाणपत्राचे वाटप

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक १७.०९.२०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 

दिनांक ०२.१०.२०२५ दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने सुचीत केले नूसार आज वि १८.०९.२०२५ रोजी मौज थावटी ता. सांगोला येथे सेवा पंधरवड्याचे उद्घाटन 

मा. आमदार सो डॉ. बाबासाहेब देशमुख, विधानसभा मतदार संघ सांगोला यांच्या हस्ते करण्यात आले. सेवा पंधरवड्याअंतर्गत नावीन्यपूर्व उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता,

 सदर कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा, मा. तहसिलदार सो सांगोला, गट विकास अधिकारी पंचायत समिती सांगोला, 

आदिवासी प्रकल्प विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी, सांगोला हे उपस्थित होते. सदर नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत मान्यवराच्या हस्ते अनुसूचित जमातीच्या ६१ जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,

सदर कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अधिकारी सो मंगळवेढा विभाग मंगळवेढा, यांनी मार्गदर्शन करताना पहिल्या टप्यात शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.

 शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे तसेच दुसऱ्या टप्यामध्ये सर्वासाठी घरे" या उपक्रमातंर्गत घरे बांधण्यासाठी निर्वाध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करणे. 

सदर उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील नियमानुकूल करणे तसेच तिसऱ्या टप्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन केले.

सदर कार्यक्रमांतर्गत गट विकास अधिकारी पंचायत समिती सांगोला यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची माहिती दिली. सदर योजनेअंतर्गत गावातील लोकांनी श्रमदान करून गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमांतर्गत मा. आमदार सो यांनी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यातील तिन्ही टप्यातील योजनेची माहिती देऊन सदर योजना शासन लोकांच्या दारी येऊन राबवित आहे त्यांचा सर्वानी लाभ घ्यावा असे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments