(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
वाढेगांव (प्रतिनिधी): – वाढेगांव ता. सांगोला येथील ग्रामपंचायतीस सोलापूर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियाना संदर्भात तसेच घरकुल योजना,
इतर सार्वजनिक कामासंदर्भात आढावा घेतला. यावेळी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते गावामध्ये चालू करत असलेल्या घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले.
काम पूर्ण झालेल्या घरकुलांचे उद्घाटन करण्यात आले तसेच अपुर्ण असलेल्या घरकुलाच्या कामाबाबतीत योग्य त्या सूचना केल्या. गावातील ग्राम सचिवालयच्या नवीन इमारतीचे काम पाहून त्यानी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूरचे अमोल जाधव, सांगोला पं. स. चे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले,
सार्वजनिक बांधकाम विभागचे महाजन, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ होळ, वाढेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. कोमलताई डोईफोडे,
उपसरपंच शिवाजी दिघे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,माणगंगा संस्थेचे वैजिनाथ घोंगडे, संजय डोईफोडे, धोंडीराम दिघे, सोमनाथ वसमाळे, बाबू हावले इ. सह गावातील नागरिक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


0 Comments