धक्कादायक! सोशल मीडियावर पोस्ट ठेवत सोलापूर जिल्ह्यातील रीलस्टार तरुणाची आत्महत्या; 'आज हम है, कल हमारी याद होगी' ठेवला संदेश
इन्स्टाग्राम अकाउंटवर संदेश लिहिलेले दोन फोटो शेअर करून २१ वर्षीय रील स्टार तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा धक्कादायक प्रकार शेळगी परिसरातील मित्र नगरात बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास उघडकीस आला.
प्रज्वल बसवराज कैनुरे (रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. ‘आज हम है, कल हमारी याद होगी’ असा संदेश त्याने फोटोवर ठेवला आहे.
बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास प्रज्वल याने घरामध्ये गळफास घेतल्याचे त्याच्या घरामधील नातलगांना आढळून आले. भाऊ रोहित याने नातलगांच्या मदतीने त्याच्या गळ्याचा फास सोडवून खाली उतरवले.
मार्केट यार्डात करायचा काम
प्रज्वल हा मार्केट यार्ड येथे काम करत होता. शिवाय तो सोशल मीडियावर स्वतःचे रील तयार करून पोस्ट करीत होता. तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
सॉरी पब्लिक, माफ करा पोस्ट
आत्महत्येपूर्वी प्रज्वलने मेसेज लिहिलेले दोन फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. पहिल्या फोटोमध्ये ‘आज हम हे, कल हमारी यादे होगी, जब हम ना होगे तब हमारी बाते होगी.!!’
तर दुसऱ्या फोटोमध्ये, सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेतला आहे मी… माझ्या आईची, माझ्या भावाची काळजी घ्या, हीच माझी इच्छा आहे.!!” अशी पोस्ट केली आहे.


0 Comments