प्रा.धनाजी चव्हाण 'नेशन बिल्डर अवार्डने' सन्मानित
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) शिक्षक दिनाच्या औचित्याने ड्रीम फाउंडेशन, सोलापूर यांचे तर्फे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व अनमोल योगदानाची दखल घेऊन
सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर, कॉलेज, सांगोला येथील प्रा.धनाजी चव्हाण यांना सोलापूर विद्यापीठ प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी यांचे हस्ते व पोलीस अधीक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली व बालाजी अमाईन्स उद्योजक
राम रेड्डी,ड्रीम फाऊंडेशन सोलापूर संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी, फिजिक्सवाला संचालक पांडुरंग फुंडे यांचे उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे संपन्न झालेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभामध्ये 'नेशन बिल्डर अवार्ड'' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा.धनाजी चव्हाण यांचा यापूर्वी तालुका, जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेकडून क्लब, उपविभाग, विभाग,प्रांत,बहुप्रांत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारासह, जीवन गौरव पुरस्काराने सन्मान झाला आहे.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य प्राचार्य अमोल गायकवाड,
उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे ,उत्तम सरगर ,काकासो नरूटे, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


0 Comments