google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..'यलमार मंगेवाडी येथील तरुणाला काठीने मारहाण'; सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

Breaking News

धक्कादायक..'यलमार मंगेवाडी येथील तरुणाला काठीने मारहाण'; सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक..'यलमार मंगेवाडी येथील तरुणाला काठीने मारहाण'; सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे शनिवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगोला पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी ज्ञानेश्वर तानाजी मदने (वय २९, व्यवसाय-शेती, रा. रामोशीवस्ती, यलमार मंगेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी वैभव जाधव (रा. पानीव, ता. माळशिरस) याने फोन करून जुन्या भांडणाचे निवारण करण्यासाठी बोलावले होते. 

फिर्यादी, त्यांचे वडील तानाजी मदने, भाऊ तुकाराम व नातेवाईक धनाजी जाधव हे घटनास्थळी पोचले असता वैभव जाधव, विशाल चव्हाण यांनी काठी व कोयत्याने हल्ला करून मारहाण केली.

तसेच वैभव जाधव, विशाल चव्हाण, कुमार चव्हाण, निवास बोडरे, विलास चव्हाण, अक्षय चव्हाण, नितीन जाधव (सर्व रा. रामोशीवस्ती, यलमार मंगेवाडी), 

अप्पा चव्हाण (रा. निमगाव), रणजित जाधव (रा. पानीव) यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादी ज्ञानेश्वर मदने, त्यांचे भाऊ तुकाराम, वडील तानाजी व धनाजी जाधव जखमी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments