google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! सोशल मीडियावर हि पत्रिका घालत आहे धुमाकूळ

Breaking News

खळबळजनक...मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! सोशल मीडियावर हि पत्रिका घालत आहे धुमाकूळ

खळबळजनक...मुस्लिम तरुणीची लग्न पत्रिका पाहून लोक झाले आश्चर्यचकीत! सोशल मीडियावर हि पत्रिका घालत आहे धुमाकूळ


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला विशेष प्रतिनिधी - लग्न म्हटलं की कुटुंबात उत्साहाचं वातावरण असतं. लग्नात अनेक प्रकारची हौस-मौज केली जाते. यामध्ये आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे लग्नाची पत्रिका.. 

आजकाल आपण पाहतो, विविध प्रकारच्या लग्नपत्रिका असतात, ज्या व्हायरल होतात. अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पण ही लग्नपत्रिका साधीसुधी नाही, तर एका मुस्लिम कुटुंबियांची ही पत्रिका आहे .

नेमकं काय खास आहे या लग्नपत्रिकेत? जाणून घ्या.. एखाद्या मुस्लीम समाजातील मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची पत्रिका हिंदी, इंग्रजी किंवा मग उर्दू अशा भाषेत वाचली असेल.

मात्र सांगोला तालुक्यातील पारे गावातील एका मुस्लीम कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं कार्ड सध्या खूप चर्चेत आहे. कार्ड व्हायरल  होण्याचं कारण म्हणजे त्यावर छापलेला फोटो आणि मजकूर .  ज्यांनी हा फोटो मजकूर पाहिला

 त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले. वास्तविक, एका मुस्लीम समाजातील कुटुंबाने रीतीरिवाजानुसार आपल्या मुलीच्या लग्नासाठी कार्ड छापले असून  

विशेषतः कार्डच्या एका बाजूला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो छापला असून पत्रिका सुरवातीला जय जिजाऊ जय शिवराय असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 

संपूर्ण एक बाजू मराठी मध्ये छापण्यात आली आहे.  इंटरनेट मीडियावर व्हायरल होणारी निमंत्रण पत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नपत्रिकेत वधू-वर आणि नातेवाईकांची नावे मुस्लीम आहेत. 

पण लग्नाच्या कार्डवर एका बाजूला मराठी भाषेत मजकूर दिसत आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संपादक व निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची सुकन्या रशिदा हिची लग्न पत्रिका आगळ्यावेगळ्या पद्धतीने छापण्यात आली आहे. 

मुख्यपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो तर एका बाजूला हिंदी पत्रिका तर  दुसऱ्या बाजूला मराठी पत्रिका छापली आहे . हिंदू मुस्लीम ऐक्याचा प्रतीक असणारी एक अनोखी पत्रिका चांगली चर्चेचा भाग ठरत आहे.

चाँदभैय्या शेख यांची कन्या रशिदा हिचा विवाह चिरंजीव सलमान सुल्तान मुलाणी यांच्यासोबत दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:००वाजता बंधन पँलेस सांगोला जि.सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

सध्या ही पत्रिका समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून शेख कुटुंबाने लग्न पत्रिका मधून सर्वधर्म समभाव व एकता कायम राहण्यासाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे.

 प्रत्येकाने अशा प्रकारे एकतेचा संदेश दिल्यास जातीभेद, धर्मभेद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही .विशेषतः भाषा ही कोणत्याही एका धर्माची किंवा समाजाची मक्तेदारी नसते तर ती जिज्ञासू आणि अभ्यासकाची असते. 

जो तिचा पाठ करेल ती त्याच्या वाणीवर विराजमान होते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाँदभैय्या शेख हे स्वतः ला मराठी मुसलमान समजतात त्यामुळे च त्यांनी बहुजनांना बांधवांना लग्न पत्रिका वाचता यावी यासाठीच मराठी मधून छापली आहे .

विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांना ते दैवत मानतात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता राखण्याची पंरपरा पारे गावातील  शेख कुटुंबात पुर्वी पासून च आहे चाँदभैय्या शेख यांचे पंजोबा बंडू शेख यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले होते .

तसेच त्यांचे आजोबा व लोकप्रिय शाहीर कै. इमाम शेख यांनी आपल्या परखड पोवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती केली होती .आणि चाँदभैय्या शेख वडिल कै.बाबालाल शेख हे देखील सामाजिक बांधिलकी जपत 

आयुष्य भर समाजसेवा केली. मागील चार  पिढ्यापासून त्यांनी मराठी भाषेत विशेष प्राविण्य मिळवले आहे .त्याच पार्श्वभूमीवर मी गेल्या २३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहे .

विशेषतः पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सुमारे  १०२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत .

विशेषतः या पत्रिकेवर पंचागानूसार लग्न विधी, तिथी, शुभ मुहूर्ताचाही उल्लेख करुन आपल्या स्नेही, मित्र परिवारांस सहकुटुंब लग्नासाठी आमंत्रित केले

 आहॆ. एवढेच नव्हे तर पत्रिकेत मित्र परिवार ,प्रेषक, कार्यवाहक, व्यवस्थापक, संयोजक, सहकार्य आदीमध्ये कोणी विशेष व्यक्ती चे नाव न टाकता सर्व राजकीय ,सामाजिक नेते मंडळी ,विविध संस्थाचे पदाधिकारी ,

शासकीय अधिकारी तसेच पत्रकार बंधू भगिनी व सर्व मित्रपरिवार असा उल्लेख करण्यात आला आहे .त्यामुळे चाँदभैय्या शेख  यांच्या या कृतीने सामाजिक ऐक्याचे एक उत्तम उदारहणच समाजात प्रस्थापित केले आहे.

Post a Comment

0 Comments