google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यात बँक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश – नकली दागिन्यांच्या आधारावर १७ लाखांहून अधिक कर्ज उचलले, १२ आरोपींवर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यात बँक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश – नकली दागिन्यांच्या आधारावर १७ लाखांहून अधिक कर्ज उचलले, १२ आरोपींवर गुन्हा दाखल

खळबळजनक..सांगोला तालुक्यात बँक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश – नकली


दागिन्यांच्या आधारावर १७ लाखांहून अधिक कर्ज उचलले, १२ आरोपींवर गुन्हा दाखल

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत तब्बल १७ लाख ४४ हजार रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. 

सोन्यासारखे दिसणारे पण प्रत्यक्षात इतर धातूपासून बनविलेले दागिने सोन्याचे असल्याचे दाखवून बँकेकडून कर्ज काढण्यात आले. या प्रकरणी सांगोला पोलिसांनी १२ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व आरोपी

या प्रकरणी फिर्याद सुहास दिनानाथ लोखंडे (वय ५५, व्यवसाय नोकरी, रा. सांगोला) यांनी दिली आहे. आरोपींमध्ये –

युवराज प्रल्हाद ठोकळे, शारदा संजय शेवतकर, रमेश दिगांबर पंडीत, रोहित संजय शेवतकर, सुनिता रमाकांत येदवर, कोमल शंकर बंडगर, मनिषा बाळासो येलपले, 

अनिता हरीदास कोळवले, किसन रामु एरंडे, रमेश मारुती शेंबडे, शंतनु महादेव पंडीत यांचा समावेश असून, अजनाळे शाखेकडील ब्रोकर/व्हॅल्युएटर संजय दत्तात्रय पंडीत याचाही समावेश आहे.

कशी झाली फसवणूक?

फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत वरील आरोपींनी संगनमत करून सोन्याऐवजी इतर धातूपासून बनविलेले दागिने सोन्याचेच असल्याचे दाखवले.

 त्यावर आधारित कर्ज घेण्यासाठी बँकेच्या छापील फॉर्ममध्ये खोटी माहिती भरली, बनावट कागदपत्रे तयार केली व ती खरी असल्याचा आभास निर्माण केला. अशा प्रकारे बँकेचा विश्वासघात करून तब्बल ₹१७,४४,००० इतके कर्ज उचलण्यात आले.

पोलिसांचा तपास

ही फसवणूक उघड होताच सांगोला पोलिस ठाण्यात गु. र. नं. ७०४/२०२५ भा.दं.सं. कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(३), ३४०(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पुढील तपासाची जबाबदारी पोना पाटील (क्र.१४२५) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नागरिकांत चर्चा – “संपूर्ण सोन्याची तपासणी व्हावी”

या प्रकरणानंतर सांगोला तालुक्यातील इतर बँकांमध्ये सोन्याच्या तारणावर घेतलेल्या कर्जांचीही सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

 नकली दागिन्यांच्या आधारे कर्ज काढण्याच्या घटना वाढल्यास बँकांचे प्रचंड नुकसान होईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पुढील कारवाईकडे लक्ष

या फसवणूक प्रकरणामुळे सहकारी बँकांवरील विश्वासाला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करून बँकेचा विश्वास परत मिळवावा,

 अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. तपासात अजून किती मोठा घोटाळा उघड होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments