google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ब्रेकिंग..पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – अवैध दारू व जुगारावर सलग कारवाया, चार आरोपी अटक

Breaking News

सांगोला ब्रेकिंग..पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – अवैध दारू व जुगारावर सलग कारवाया, चार आरोपी अटक

सांगोला ब्रेकिंग..पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – अवैध दारू व जुगारावर सलग कारवाया, चार आरोपी अटक


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला पोलिसांनी समाजविघातक प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी सलग धडक कारवाया करत अवैध दारू विक्री आणि जुगार खेळणाऱ्यांवर मोठी कुरघोडी केली आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली

 करण्यात आलेल्या या कारवायांमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून रोकड, जुगार साहित्य तसेच देशी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.जुगार खेळताना दोन आरोपी रंगेहात अटक

दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी पोलिसांनी प्रथम मौजे जुनोनी येथील जुजारपूर रोडलगत पिंपळाच्या झाडाखाली छापा टाकला. या कारवाईत अजित रामचंद्र गुळीग (वय 32, रा. गौडवाडी, ता. सांगोला) 

हा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून अंक-आकड्यांवर पैशांचा जुगार खेळत असताना रंगेहात पकडला. त्याच्याकडून 790 रुपये रोकड, निळ्या रंगाची शाईपेन आणि “कल्याण” आकडे असलेली चिठ्ठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगोला शहरातील आठवडा भाजी बाजार परिसरात आणखी एक छापा टाकण्यात आला. येथे अमोल चंद्रकांत खंदारे 

(वय 42, रा. भारत गल्ली, सांगोला) हा देखील लोकांकडून जुगार खेळत असताना पकडला गेला. त्याच्याकडून 1,570 रुपये रोकड, निळ्या रंगाची शाईपेन आणि जुगाराच्या चिठ्ठ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अवैध दारू विक्रीवर दोन छापे, दोन आरोपी अटक

याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मौजे जुनोनी येथील महाकाली हॉटेल शेजारी छापा टाकून पोलिसांनी अवैध दारू विक्री करणारा अमोल गोरख गुळीग (वय 35, रा. गौडवाडी, ता. सांगोला) याला अटक केली. 

त्याच्याकडून देशी दारू संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 28 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची एकूण किंमत अंदाजे 2,240 रुपये इतकी आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता मौजे वाढेगाव येथे हॉटेल विराजच्या पाठीमागील द्राक्ष बागेत पोलिसांनी आणखी एक कारवाई केली.

 येथे नवनाथ कृष्णदेव गुरव (वय 45, रा. आलेगाव, ता. सांगोला) हा इसम देशी दारू बेकायदेशीररीत्या विक्री करताना सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून संत्रा कंपनीच्या 180 मिलीच्या 14 बाटल्या जप्त केल्या. 

या दारूची किंमत अंदाजे 1,320 रुपये आहे. आरोपीविरुद्ध दारूबंदी कायदा कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/1242 बनसोडे करत आहेत.पोलिसांची कठोर भूमिका घेत

या सर्व कारवाया पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केल्या. सततच्या या धडक कारवायांमुळे सांगोला शहर व तालुक्यातील अवैध जुगार व्यवसाय व दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगोला पोलिसांनी समाजविघातक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशीच धडक कारवाई पुढेही सुरू राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments