सांगोला ग्रामीण रुग्णालयात “सशक्त नारी, स्वस्थ परिवार” अभियानाचा उत्साहात शुभारंभ “१ ऑक्टोबरपर्यंत
सांगोला ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यासाठी पाठपुरावा – माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे आश्वासन” “ट्रॉमा केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होईल – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भूमिका”
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / करण मोरे : भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी ७५ व्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून
सांगोला ग्रामीण रुग्णालयात “सशक्त नारी, स्वस्थ परिवार” या अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि. २१ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात करण्यात आला.
या अभियानाच्या शुभारंभी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते. तसेच युवा नेते दिग्विजय पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप देवकते,
दत्तात्रय सावंत, दीपक गोडसे, डॉ. रणजीत केळकर, डॉ. विजय बंडगर, विनोद उबाळे, खंडू सातपुते, विनोद बाबर, अमित पाटील, सुरेश काळे, बापूसाहेब ठोकळे, मिलिंद बनसोडे, सतीश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, “सांगोला येथील ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण असून शासनाने आवश्यक डॉक्टरांची भरतीही केली आहे.
पावसाळी अधिवेशनात या केंद्रासाठी आवश्यक उपकरणे व यंत्रसामग्री पुरवून ते लवकरच कार्यान्वित केले जाईल, अशी खात्री आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.”
तर माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आश्वासन देताना सांगितले की, “सांगोला ग्रामीण रुग्णालयालगतच्या ट्रॉमा केअर सेंटरचे ८० टक्के काम पूर्ण झाले
असून फक्त २० टक्के काम उरले आहे. पुढील आठवड्यात मी स्वतः आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन हे केंद्र सुरु करण्यासाठी पाठपुरावा करणार असून १ ऑक्टोबरपर्यंत ट्रॉमा केअर सेंटर १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा प्रयत्न करू.”
दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवांबाबत बोलताना आमदार डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले की, “येथे सर्पदंश, डिलेव्हरी, सिजर ऑपरेशन, विविध लसी यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा.”
अभियान अंतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र व दंत तपासणी, स्तन व गर्भाशय कॅन्सर तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, हिमोग्लोबिन व क्षयरोग तपासणी करण्यात आली.
तसेच महिलांच्या सशक्तीकरणासाठी निरोगी जीवनशैली, पोषण आहार यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याशिवाय माता व बाल सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृबंधन योजना, आयुष्यमान वयोवंदन कार्ड इत्यादी योजनांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. भगवान पवार (उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे), डॉ. वर्षा डोईफोडे (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ. एस.पी. कुलकर्णी (बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधीक्षक, सोलापूर), डॉ. अरविंद गिराम (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सांगोला)
, तसेच डॉ. उत्तम फुले, डॉ. पूजा साळे, डॉ. शंभूराजे साळुंखे, डॉ. वंदना चाकणे, डॉ. अनमोल गवारे, डॉ. असिफ सय्यद, डॉ. वैभव जांगळे आणि सर्व मेडिकल, पॅरामेडिकल व नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.
मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यात राबविण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.


0 Comments