ब्रेकिंग न्यूज..सांगोल्यात तरुणाचा गळफास घेत मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील शुभम महादेव राजगुरू (वय 20) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना शनिवारी (दि. 20 सप्टेंबर) रात्री घडली. शुभम याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे समजते. त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,
सांगोला येथे नातेवाईकांनी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार झोळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


0 Comments