google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नाझरे व परिसरात हवामान बदलामुळे साथीच्या आजारात मोठी वाढ..- डॉ.शिवाजीराव ढोबळे

Breaking News

नाझरे व परिसरात हवामान बदलामुळे साथीच्या आजारात मोठी वाढ..- डॉ.शिवाजीराव ढोबळे

नाझरे व परिसरात हवामान बदलामुळे साथीच्या आजारात मोठी वाढ..- डॉ.शिवाजीराव ढोबळे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

नाझरे प्रतिनिधी नाझरे, बलवडी, वझरे, चोपडी, अनकढाळ, राजुरी, उदनवाडी, चिनके, वाटंबरे, अजनाळे व परिसरात हवामान सतत बदलत असल्याने ग्रामीण भागात विविध जातीच्या आजारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 दिवसभर उन्हाचा तडाका, रात्री पाऊस, थंडी व दमटपणा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. व ताप, खोकला, जुलाब, उलट्या, अंगदुखी, 

सर्दी, डेंगू इ. इत्यादी आजाराने अनेक गावांमध्ये स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध, शेतकरी, नागरिक यांना त्रास होत आहे व यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने येथे रुग्णांची मोठी गर्दी होत आहे असे डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सांगितले. 

      लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया यांना बदलत्या वातावरणामुळे अंगात कणकण ताप याचा त्रास होत आहे. तर शाळकरी विद्यार्थ्यांना ताप, खोकला, शेतकरी वर्गात अंगदुखी, ताप, जुलाब यासारख्या आजारामुळे शरीरावर परिणाम होत आहे. 

    सध्याच्या हवामान बदलामुळे संसर्ग जन्य रोगांना खतपाणी मिळत आहे तरी नागरिकांनी दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करावी व उकडलेले पाणी पिणे तसेच हलका व पौष्टिक आहार घेणे व जिथे पाणी साचते ती ठिकाणी त्वरित स्वच्छ करणे आवश्यक आहे 

अन्यथा डेंगू,मलेरिया यासारख्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो असे डॉक्टर ढोबळे यांनी सांगितले. तर नाझरे व परिसरातील रस्त्यावरील खड्डे, गटारीची साफसफाई, साचलेले पाणी काढून टाकणे व गावातून गटारीवर,

 गवतावर बोळा बोळामध्ये जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे असे नागरिकांचे मत आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये व सर्दी खोकल्याच्या रुग्णांनी मास्क वापरावा व स्वच्छ पाणी प्यावे तसेच वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे ही गरजेची आहे 

व यामुळे साथीच्या रोगापासून बचाव होईल तरी रुग्णांनी सध्या बदलत्या हवामानात काळजी घेणे गरजेचे आहे असे डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments