झाडे लावा – जीवन वाचवा” : जश्ने ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटी सांगोलाच्या वतीने भव्य वृक्षारोपण
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला प्रतिनिधी : सांगोला शहरात जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा सुंदर उपक्रम राबवण्यात आला.
ईद मिलादुन्नबीच्या पवित्र जश्नानिमित्त शहरातील विविध धार्मिक व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गरक्षणाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत जामा मस्जिद, काली मस्जिद, दर्गा मस्जिद, जामिया सिद्दीकीया फैजान उल उलूम मदरसा, जामिया फातिमतू जोहर लेडीज मदरसा, ख्वाजा गरीब नवाज मस्जिद तसेच
सांगोला शहरातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. हिरवाईतून शुद्ध हवा, निरोगी आयुष्य आणि पुढील पिढ्यांसाठी जीवनदायी वारसा मिळावा हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू होता.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन हाजी शब्बीर भाई खतीब, कमरुद्दिन खतीब, फिरोज खतीब, शकील तांबोळी, तोफिक मुजावर, तोहीद मनेरी, हमीद बागवान, हाजी गुलामगौस नाडेवाले यांनी केले. उपस्थित नागरिकांना “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जुलूस कमिटी शहर सांगोलाचे अध्यक्ष शौकत खतीब, उपाध्यक्ष अयाज बाबा मनेरी, खजिनदार अब्दुल कादिर इनामदार, सचिव समीर खाटीक तसेच तरुण कार्यकर्ते आयान मुल्ला, अरमान मुजावर, रेहान शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
वृक्ष आपल्याला केवळ प्राणवायूच देत नाहीत, तर छाया, फळे, औषधे व निसर्गातील संतुलन राखण्याचे अमूल्य कार्य करतात. वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्षारोपण हा काळाचा संदेश आहे.
जुलूस कमिटीने केलेला हा उपक्रम सांगोला शहरासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, समाजाला हरित जीवनाचा संदेश देणारा आदर्श उपक्रम ठरला आहे.



0 Comments