google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास धक्का,संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती,पक्ष श्रेष्ठींचा विश्वास नसल्याचे दिले कारण

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास धक्का,संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती,पक्ष श्रेष्ठींचा विश्वास नसल्याचे दिले कारण

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास धक्का,संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा


विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती,पक्ष श्रेष्ठींचा विश्वास नसल्याचे दिले कारण
 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर:-गेल्या अनेक दशकापासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक खंबीर आणि आक्रमक नेतृत्व अशी ओळख राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा

 पक्ष प्रमुख एकनाथ  शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.शिवाजी सावंत यांनी तीन वेळा माढा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना शिवाजी सावंत यांनी या जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा हाती घेत 

राजकीय वाटचालीस सुरुवात केली.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते.

आणि यातूनच पक्षाने त्यांच्यावर सोलापूर जिल्हा समन्वयक,जिल्हा संपर्क प्रमुख अशा जबाबदाऱ्या टाकल्याचेही दिसून आले होते.पुढे २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणे पसंत केले.

संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपिवण्यात आली होती.मात्र गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात गटबाजी बोकाळली

 असल्याचेच चित्र पहावयास मिळत होते.यातूनच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र होते.

नुकताच पंढरपुरात शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा देखील शिवाजी सावंत यांनी घेतला होता.मात्र या मेळाव्यास अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले होते.

आणि या मेळाव्यात बोलताना अनेक पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधत जिल्ह्यात संपर्क प्रमुखाला विचारात न घेता,माहिती न देता परस्पर अनेक पदाधिकारी नियुक्त केले

 जात असल्या बाबत उघड नाराजीही व्यक्त केली होती.तर मागील दोन महिण्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदेग गटात अनेक पक्ष प्रवेश झाले

 परंतु त्यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने शिवाजी सावंत हे उपस्थित देखील नसल्याचेच पहावयास मिळाले होते.आणि यातूनच शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.     

तर माढा तालुक्यात देखील शिवसेनेत मोठी गटबाजी दिसून येत असल्याचेच चित्र असून लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले संजय कोकाटे हे पुन्हा शिवसेना शिंदेग गटात परत आले आहेत

 तर नुकतंच त्यांनी माढा तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठकही घेतली होती.त्यामुळे अशा विविध घडामोडी पहाता अखेर शिवाजी सावंत यांनी आपला राजीनामा दिला आहे.

Post a Comment

0 Comments