स्वर्गीय आ.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या पुण्यस्मरण व जयंती दिनानिमित्त
"मोफत महाआरोग्य तपासणी व महा रक्तदान शिबिराचे" ८ ऑगस्ट रोजी भव्य आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आम.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ३० जुलै पुण्यतिथी व १० ऑगस्ट रोजी जयंती दिनानिमित्त
"मोफत महाआरोग्य तपासणी व महारक्तदान शिबिर" शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सांगोला तालुका व पंचक्रोशीतील गोर गरीब गरजू रुग्णांसाठी आयोजित करण्याचे योजिले आहे.
सदरच्या शिबिरामध्ये "रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा"मानून सोलापूर व सांगली जिल्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने गरजू रुग्णांची मोफत रक्त तपासणी मोफत औषधे वितरण होणार आहे.
तसेच "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान, जीवनदान.." या संकल्पनेखाली महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना यासंबंधी तसेच
सर्व शासकीय योजनांची माहिती सांगोला पंचक्रोशीतील लोकांना देण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने प्रत्येक व्यक्तींचे मोफत वैद्यकीय सुविधा व शस्त्रक्रिया यांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड
, गोल्डन कार्ड हे काढून देण्यात येणार आहे.या शिबिरामध्ये मोफत कर्करोग तपासणी,बोन डेंसिटी टेस्ट ,डोळ्यांची तपासणी- मोफत चष्मे वाटप, मोफत कार्डिओग्राम - हृदयाची तपासणी
तसेच ६० वर्षावरील सर्व लोकांची मोफत अँजिओग्राफी आणि गरज भासल्यास मोफत अँजिओप्लास्टी करणे या विषेश आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.सदरच्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरासाठी कॅन्सर
, हृदयरोग, मेडिसिन, अस्थिरोग ,स्त्रीरोग,बालरोग,सर्जरी व मूत्ररोग, त्वचारोग, नेत्ररोग ,मणका व मेंदूरोग ,पोटाचे विकार इत्यादी विविध विभागाचे तज्ञ डॉक्टर्स तसेच हृदयरोग तज्ञ आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख
व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.निकीताताई देशमुख सर्व गोरगरीब गरजू रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी उपस्थित राहणार असून सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन
लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी यांनी केले आहे. सदरचे शिबिर हे सर्व रुग्णांच्या सोयीसाठी सांगोला एसटी स्टँड पासून जवळच जुने जे.एच. कलेक्शन( गुगळे कलेक्शन)चा हॉल, अजिंक्य प्लाझा,वासुद चौक,
सांगोला येथे शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित केले आहे. तरी सांगोला ,आटपाडी, मंगळवेढा, जत,पंढरपूर इ. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
0 Comments