कामाचा व्यक्ती हरपला... -आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख राहुल ऐवळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
नाझरे प्रतिनिधी सांगोला, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ व आष्टा परिसरात राहुल बाबासाहेब ऐवळे हे मोजमापन कामगिरीने ओळखले जात होते व त्याच्या अकाली निधनाने कामाचा व्यक्ती हरपला
असे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नाझरे ता. सांगोला येथे शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना मत व्यक्त केले.
तसेच शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना व सांगोला तालुक्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे आमदार देशमुख यांनी श्रद्धांजली प्रसंगी सांगितले.
राहुल ऐवळे यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम नाजरे येथे संपन्न झाला. तसेच राहुल याच्या कामाचे पैसे कोणाकडे असतील
तर ते प्रामाणिकपणे त्यांच्या कुटुंबाला देऊन सहकार्य करावे व धायगुडे पाटील परिवार व बलवडी ग्रामस्थ तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो
असे युवा नेते उल्हास दादा धायगुडे पाटील यांनी श्रद्धांजलीप्रसंगी सांगितले. तर देवाण घेवाण व इतर अडचणी असल्यास नाथ असोसिएशन यांना संपर्क साधा असे आवाहन इंजिनिअर शंकर ऐवळे यांनी सांगितले.
शिक्षक नेते शिवभूषण ढोबळे यांनी परिवार व नाझरे गावाचे वतीने श्रद्धांजली वाहिली. तर आटपाडी व परिसरात राहुल ऐवळे यांचे मोजमापन पद्धतीचे काम कौतुकास्पद होते
त्यांच्या अपघाती निधनाने ऐवळे, जावीर कुटुंबावर फार मोठा आघात झाला, ईश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देवो व त्यांच्या कुटुंबात खरात परिवार, आरपीआय परिवार व आटपाडी ग्रामस्थ तर्फे श्रद्धांजली अर्पण करतो
असे आरपीआय नेते राजेंद्र खरात यांनी शोक सभेत सांगितले. यावेळी उपस्थित ऐवळे, जावीर परिवार, मित्र मंडळ, पाहुणे, व सर्व स्तरातील नागरिक यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून राहुल यास श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments