सांगोला तालुक्यात कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी-बियाणे वाटप..! मुलाणी यांच्या स्तुत्य उपक्रम
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला. (प्रतिनिधी) – शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी, हरित क्रांतीचे प्रणेते तथा पहिले
शेतकरी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून उदनवाडी ग्रामपंचायत हद्दीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी शेती नांगरत असताना
बी-बियाण्यांचे वाटप महाराष्ट्र विधिमंडळ स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी यांनी एक स्तुत्य उपक्रम केला आहे. तसेच, उदनवाडी ग्रामपंचायत सरपंच वि. सरगर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच आपल्याला अन्न मिळते.
त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खूप महत्व आहे. दि. 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा
हा आठवडा आणि 7 जुलैला संपणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.
नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तसेच त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठा'ची स्थापना केली.
शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग त्यांनी दाखवला आहे असे मुलाणी यांनी सांगितले.
हीच त्यांची आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. डॉ. भाईगणपतराव देशमुख यांची प्रेरणा घेऊन तसेच जून महिन्या उलटून गेल्या नंतर शेतकरी शेतीच्या कामात रमला आहे त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आम्ही बी - बियाणे वाटप केले आहे, असे मुलाणी म्हणाले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्याम शिंदे म्हणाले की, गावातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला गट तयार करून त्यांची नावे आमच्या कडे सुपूर्द करावी जेणेकरून आम्हाला सर्व शेतकऱ्यांना बी - बियाणे देण्यास सोप्पे होईल.
महाराष्ट्र शासन दि. 01 जुलै हा कृषी दिन साजरा करतो. शेतकरी शेतात घाम गाळून, सोन पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या उपक्रमासाठी गावातील ग्रामपंचायतीचे अधिकारी दशरथ लवटे, तलाठी वंदना गुप्ता उपस्थित होत्या.
याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळ स्वीय सहाय्यक शाहरुख मुलाणी, जुनोनी उप कृषी अधिकारी श्रीधर शेजवळ, उदनवाडी ग्रामपंचायत सरपंच वि. सरगर, माजी सरपंच फारूक मुलाणी,
बालेखान शेख, दिगंबर शिंगाडे, समर्थ वलेकर, विकास वलेकर, संदीप सरगर, अरविंद वलेकर, प्रशांत वलेकर अशोक वलेकर, चंद्रकांत वलेकर, गोविंद केंगार, उत्तम वलेकर, गोट्या सरगर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाची गावोगावी, तालुक्यात तसेच जिल्ह्यात चर्चा रंगली असून शेतकऱ्यांना मदत केल्याच्या अनुषंगाने या उपक्रमाबद्दल मुलाणी यांचे कौतुक होत आहे.
0 Comments