धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या
तिचं दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम, वडिलांनीच रचला हत्येचा कट; राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासा
टेनिसपटू राधिका यादव हिच्या कमाईवर जगत असल्याने तिचे वडील दीपक यादवला सतत टोमणे मारण्यात येत असत. त्यामुळे संतापून तिची हत्या केली,
अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.राधिका चालवत असलेल्या टेनिस प्रशिक्षण संस्थेवरूनही तिचे वडिलांशी वाद झाले होते. आरोपी दीपकला न्यायालयाने शुक्रवारी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. पहिल्या मजल्यावर हा गोळीबार झाला त्यावेळी राधिकाची आई मंजू यादव त्याच ठिकाणी होती, असे दीपकचा भाऊ कुलदीप यादव याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मंजू ही गोळीबाराच्या वेळी तळमजल्यावर होती, असे आधी पोलिसांना सांगण्यात आले होते. कुलदीप यांनी सांगितले की दीपक, त्याची पत्नी मंजू आणि मुलगी राधिका हे तिघेही या घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, तर मी कुटुंबासह तळमजल्यावर राहतो.
गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास स्फोटासारखा आवाज ऐकू आला. त्यामुळे मी धावत पहिल्या मजल्यावर गेलो. तिथे राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात, तर रिव्हॉल्व्हर ड्रॉइंग रूममध्ये पडलेले होते.
तेवढ्यात माझा मुलगा पीयूष यादवही तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर आला. आम्ही दोघांनी राधिकाला तातडीने एशिया मारिंगो रुग्णालयात नेले; पण तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (वृत्तसंस्था)
उत्तम टेनिसपटू
गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, राधिका एक टेनिस अकॅडमी चालवत होती. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने राधिकाला १९९९वा क्रमांक दिला होता.
राधिकाने या वर्षी सुरुवातीला इंदूर आणि क्वालालंपूर स्पर्धामध्ये भाग घेतला होता. मात्र त्या मुख्य फेरीच्या नव्हे, तर पात्रता फेरीच्या स्पर्धा होत्या.
प्रेमगीताचा व्हिडीओ तयार केला
टेनिसपटू राधिका यादव हिने गेल्या वर्षी एका कलाकारासोबत प्रेमगीताच्या व्हिडीओचे चित्रीकरण केले होते. त्यामुळेही तिच्या घरात तणाव वाढला होता.
राधिकाच्या पाठीवर तीन व खांद्यावर एक अशा चार गोळ्या लागल्या. तिच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राधिकाने टेनिस प्रशिक्षण अकादमी 3 चालविणे तिच्या वडिलांना पसंत नव्हते. ती संस्था बंद करावी, असा वडिलांनी दिलेला आदेश मानण्यास तिने नकार दिला होता. तिचे वडील दीपक यादव हा गेल्या १५ दिवसांपासून विलक्षण निराश होते, असेही तपासात उघड झाले आहे.
आई घरातच होती, मग…
या प्रकरणात ज्या वेळी मुलीची हत्या झाली, त्या वेळी आई मंजू यादव घरीच होती. याची माहिती राधिकाच्या वडिलांविरुद्ध एफआयआर दाखल
करणारे काका कुलदीप यादव यांनीही दिली. त्यांनी सांगितले की गोळीचा आवाज ऐकून जेव्हा ते घरी पोहोचले, तेव्हा आई तिथेच होती.
पोलिसांनी विचारणा केली असता, आईने या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला. मी आजारी होते, असे तीने सांगितले.
0 Comments