पत्रकारांवर हल्ला केल्यास ठरेल अजामीनपात्र गुन्हा; कायदा करणारे भारत देशातील पहिले राज्य ठरले
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असून, अशा गुन्ह्यांमध्ये आता थेट अटक होणार आहे.
महाराष्ट्र राज्याने २०१७ मध्ये तयार केलेला पत्रकार संरक्षण कायदा अखेर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र देशातील असा कायदा प्रत्यक्षात लागू करणारे पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.
या कायद्यानुसार, पत्रकारांवर हल्ला हा अजामीनपात्र (Non-bailable) आणि दखलपात्र (Cognizable) गुन्हा ठरेल.
यामुळे पोलिसांना अशा आरोपींना थेट अटक करता येणार असून, न्यायालयीन परवानगीची आवश्यकता नाही. याचबरोबर आरोपींना लगेच जामीनही मिळणार नाही.
पत्रकार संरक्षण कायदा २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्षात तो लागू करण्यात यावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. याच पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी आवाज उठवला होता.
या कायद्यानुसार, पत्रकार आणि मीडियावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे, मारहाण करणे, त्यांचे साहित्य फोडणे, धमकी देणे यासारख्या घटनांना आता गुन्हा समजले जाणार आहे.
या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात(ptection Officer) नेमण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. यामुळे आता पत्रकारांना काम करताना
अधिक सुरक्षितता लाभणार आहे.मुंबईचे भाजप नेते किशोरभाई माने यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, हा कायदा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.
हा कायदा प्रभावीपणे राबवला गेला, तर पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबतील अशी आशा व्यक्त होत आहे. मीडिया क्षेत्रातील सर्व पत्रकार व कर्मचारी यांच्यात या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे.
0 Comments