क्रांतीज्योती महिला पतसंस्थेची गगन भरारी आकाशाला भिडेल..
- चेअरमन सौ. भाग्यश्री बनकर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी क्रांतीज्योती महिला पतसंस्थेचे सर्व सभासद, संचालक, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार व कर्मचारी या सर्वामुळे संस्थेची प्रगती होत असून, सर्वांच्या सहकार्यामुळे यंदा संस्थेस 52 लाख सतरा हजार 193 रुपये इतका नफा मिळाला
व त्यामुळे संस्थेची गगन भरारी लवकरच आकाशाला भिडेल असे वाटते असे मत चेअरमन सौ. भाग्यश्री रामचंद्र बनकर यांनी हर्षदा लॉन्स सांगोला येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष भाषणात व्यक्त केले.
सुरुवातीस चेअरमन भाग्यश्री बनकर, व्हाईस चेअरमन सौ. दिपाली बनकर, संचालिका निलाबाई माळी, सुशीला बनकर, रेशमा बनकर, अश्विनी बनकर, मनीषा बनकर, अंकिता बनकर, वैष्णवी शिंदे, राणी बनकर व
गीता खडतरे इत्यादींच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, ठेवीदार, कर्जदार, पिग्मी एजंट, इ. चा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक शिक्षक नेते सोमनाथ बनकर यांनी केले तर अहवाल वाचन सी ओ गणेश माळी यांनी केले, यावेळी सर्व ठराव, नफा तोटा पत्रक या सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली.
यावेळी सर्टिफाइल ऑडिटर मणेरी् साहेब, मार्गदर्शक सीए उत्तम बनकर, एस. टी. बनकर, विष्णू गोडसे, मा. उपनगराध्यक्ष सुरेश माळी, संस्थापक रामचंद्र बनकर यांनी संस्थेची प्रगती बाबत मत व्यक्त केले.
क्रांतीज्योती पतसंस्था, रोटरी क्लब व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत महिलांसाठी
हिमोग्लोबिन तपासणी व रक्तातील साखर इत्यादी बाबत शिबिर घेण्यात आले. अहवाल सालात सभासदांना सहा टक्के लाभांश व दीपावली भेट म्हणून पाच किलो साखर, दोन किलो हरभरा डाळ, दोन किलो तेल,
एक मोती साबण व कापडी पिशवी देण्याचे ठरले आहे व ज्या सभासदांनी एक हजार रुपये भरले आहेत त्यांनी रुपये 4000 भरून आपला शेअर्स पूर्ण करावा असे आवाहन संस्थापक रामचंद्र बनकर यांनी केले आहे.
क्रांतीज्योती पतसंस्थेतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर, गुणवंत शिक्षिका पुरस्कार, इतर सामाजिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविले जात असून, सर्व कर्मचाऱ्यांची सभासदांना वागणूक चांगली मिळते
व संस्थेचा विकास व प्रगती तर होणारच आहे व संस्था महाराष्ट्रात एक नंबर वर येणार. तसेच गुणवंत शिक्षिका, उद्योजक यांचे बोर्ड पतसंस्थेत लावा.... मा. मुख्याध्यापक तानाजी केदार
सदर प्रसंगी तज्ञ संचालक मनीषा बनकर, तृप्ती बनकर, सीमा बंडगर, कायदेशीर सल्लागार एडवोकेट चैत्रजा बनकर, सल्लागार विजय आधाटे, अजित अडसूळ, के. आर. वाघमारे, सचिन बनकर, उमेश बनकर, चंद्रकांत बनकर,
एसबीआय अधिकारी राहुल बनकर, संभाजी बनकर, आप्पा शिंदे, बाळासो बनकर, सर्व सभासद, संचालक, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार पूनम बनकर यांनी मानले.
0 Comments