google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी? कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

Breaking News

धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी? कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी? कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले


सोलापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आली. सोलापुरच्या माढा तालुक्यातील अरण गावात ही धक्कादायक घटना घडली. ४ दिवसांपूर्वी या मुलाचे अपहरण करण्यात आले. 

त्यानंतर दगडाने ठेचून या मुलाची हत्या करत मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला.या घटनेमुळे सोलापुरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माढ्याच्या अरण गावातून अपहरण झालेल्या १० वर्षांच्या शाळकरी मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. 

कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाचे नाव होते. १५ जुलै रोजी कार्तिक खंडागळे याचे शाळेच्या मैदानावरून अपहण करण्यात आले होते. 

४ दिवसांनंतर कार्तिकचा मृतदेह कालव्यात आढळून आला. त्याच्या हत्येमागचे कारण अस्पष्ट आहे. टेंभुर्णी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कार्तिक शाळेच्या मैदानावर खेळत असताना १५ जुलैला त्याचे अपरहण करण्यात आले होते. एका अज्ञात व्यक्तीने कार्तिकला पळवून नेले होते. या प्रकरणी कार्तिकच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. पोलिस कार्तिकला शोधत होते. कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. 

कार्तिकच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्तिकची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.

 रक्ताने माखलेल्या अवस्थेत कार्तिकचा मृतदेह दिसून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments