google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक!चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्या; पंढरपुरातील धक्कादायक घटना

Breaking News

धक्कादायक!चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्या; पंढरपुरातील धक्कादायक घटना

धक्कादायक!चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना तीन महिला भाविक बुडाल्या; पंढरपुरातील धक्कादायक घटना


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंढरपूर : पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दोन महिलांचा तर एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला.

सुनिता सपकाळ आणि संगीता सपकाळ अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत. तर एका महिलेबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी या महिला भक्त पुंडलिकाजवळ आल्या होत्या. उजनी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या. 

यावेळी प्रशासनाचे जीवरक्षक उपस्थित नव्हते. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा या ठिकाणी हजर नसल्याचा आरोप यावेळी मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला.

दरम्यान, पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रामध्ये कायमस्वरूपी जीवरक्षक नेमणूक करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी वर्षभर राज्य व परराज्यातून अनेक भाविक येत असतात.

 पंढरपूरमध्ये आल्यावर पहिल्यांदा चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी येतात. नदीमधील पाण्याचा अंदाज नसल्याने अनेक भाविक वाहून गेल्याच्या किंवा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रशिक्षित जीवरक्षक कायमस्वरूपी नेमावेत

पाण्यात बुडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यावर उपाय म्हणून प्रशासनाने अनुभवी व प्रशिक्षित कायमस्वरूपी जीवरक्षक नेमणूक करणे गरजेचे आहे. 

जेणेकरून भविष्यात अशा घटना काही प्रमाणात घडणार नाहीत, यावर आपण तात्काळ अंमलाबजावणी करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यकारी अधिकारी यांना नियमित जीवरक्षक

 नेमण्याकरिता योग्य त्या सूचना कराव्यात ही विनंती, असे गणेश अंकुशराव यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments