माजी आमदार दिपकआबांच्या हस्ते श्री.जनार्दन अठराबुद्धे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी मुळगाव घेरडी (ता. सांगोला) येथील आणि सध्या कळंबोली, नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले कुलाबा मनपा माध्यमिक शाळेतील गुणी व
लोकप्रिय सहाय्यक शिक्षक श्री. जनार्दन अठराबुद्धे सर यांचा वाढदिवस कार्यसम्राट मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व आत्मीयतेने साजरा करण्यात आला.
श्री अठराबुद्धे सर हे गेली पंधरा वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.
त्यांची समाजकार्याची आवड ही शिक्षणाच्या बाहेरही जाणवते. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून, सांगोला तालुक्यातीलच नव्हे
तर मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक लोकांशी त्यांचा जवळचा संपर्क आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे त्यांना परिसरात मोठा आदर व प्रेम मिळते.
या कार्यक्रमात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, "जनार्दन सरांसारखे निष्ठावान,
संवेदनशील आणि समाजहिताचा विचार करणारे कार्यकर्ते हे कोणत्याही नेतृत्वाची खरी ताकद असतात. शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य ते अत्यंत मनापासून करत आहेत.
त्यांच्या कार्यतत्परतेला आणि सातत्यपूर्ण समाजसेवेला माझा मन:पूर्वक सलाम. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य व अधिक व्यापक कार्यक्षेत्र लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
अशा खंबीर कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा मला मिळालेला सन्मान, ही माझ्यासाठीदेखील अत्यंत भावनिक आणि आनंदाची बाब आहे." असे गौरवउद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दिपकआबानी आपल्या कार्यशैलीची पुन्हा एकदा झलक दाखवली. मुंबईमध्ये आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून
कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करणे ही त्यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता अधोरेखित करणारी बाब आहे.
कार्यकर्त्याला ताकद देणारा, जपणारा, आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे दिपकआबा हे या प्रसंगातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
या वाढदिवस समारंभात उपस्थित सर्व मान्यवरांनी अठराबुद्धे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे कार्य उदंड व्हावे, अशी मनोकामना व्यक्त केली.
या प्रसंगी श्री. विशाल साळुंखे, संतोष ननवरे, सचिन जाधव, विक्रम साळुंखे, दीपक चव्हाण, राजाराम ननवरे, सचिन ननवरे, बालाजी साळुंखे, बाळू पिचके, बबलू पठाण, बंडू मोहिते, गोरख माने,
किरण केसकर, शिवाजी गायकवाड, पांडुरंग माने, मधुकर गायकवाड, फंटू गायकवाड, सोमेश्वर इंगवले, श्रीकांत माने, संभाजी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता.
0 Comments