धक्कादायक! आषाढी एकादशीनिमित्त शाळकऱ्यांच्या दिंडीत फुगडी खेळताना
सांगोला तालुक्यातील माजी सभापतींना चक्कर येऊन मृत्यूने गाठले
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:-सांगोला तालुक्यातील जवळा येथील शाळेकडून आषाढी एकादशीनिमित्त काढलेल्या मुलांच्या दिंडीत 'ज्ञानोबा तुकोबा विठू नामाचा गजर करीत फुगडी खेळताना चक्कर येऊन
जि. प. चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती साहेबराव बाबासाहेब पाटील (वय ७४) यांचे धक्कादायकरित्या निधन झाले. शनिवारी सकाळी १०:३० च्या सुमारास शाळा परिसराच्या आवारात ही घटना घडली.
यानंतर तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, पाच बहिणी, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, जवळा गटातून जि. प. सदस्य तसेच जवळा ग्रामपंचायतीचे त्यांनी सलग १५ वर्षे बिनविरोध सरपंच पदावर काम पाहिले.
किसान आर्मी वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांचे ते मामा होत. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्यावर जवळा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले.
0 Comments