नराधमांची क्रुरता! 60 वर्षांच्या व्यक्तीचं मुंडकं, हातच नाही तर प्रायव्हेट पार्टही कापला,
शेतीच्या जुन्या वादातून हत्या, मुलाचे गंभीर आरोप, बुलढाण्यातील घटना
बुलढाणा: राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
अशातच गेल्या दोन महिन्यापूर्वी लोणार तालुक्यातील वढव येथे अपहरण करून अशोक सोनूने यांची हत्या करण्यात आली होती.
11 मे रोजी लोणार पोलीस स्टेशनला जात आहे, असं सांगून घरून निघून गेले ते परत कधी आलेच नाहीत.
गेल्या 10 जून रोजी त्यांचा मृतदेह मुंडके आणि दोन्ही हात नसलेल्या कुजलेल्या अवस्थेत लोणार शहरालगत आढळून आला होता. या घटनेला देखील आता महिना उलटला असून पोलिसांकडून या प्रकरणात योग्य ती कारवाई केली
जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता विधानसभेत या प्रकरणाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच आता अशोक सोनुने यांच्या मुलाने खळबळजनक आरोप केला आहे.
लोणार तालुक्यातील वढव या गावचे 60 वर्षीय अशोक आबाजी सोनुने हे 11 मे रोजी लोणार पोलीस स्टेशनला जात आहे, असं सांगून घरून निघून गेले.
मात्र ते सायंकाळी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेत असला असता ते मिळून आले नाही. यावरून त्यांच्या पत्नीने लोणार पोलीस स्थानकात हरविल्याची तक्रार दिली होती.
मात्र काही दिवसानंतर अशोक सोनुने यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. याप्रकरणी लोणार पोलिसानी गुन्हा दाखल करून चौकशी केली असता पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शेतीच्या जुन्या वादातून ही हत्या झाली
असून आरोपी हे अशोक सोनुने यांच्या भावकीतीलच असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक असून एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपीचा शोध घेत पोलीस सध्या तपास करत आहे.
मात्र, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी दलित नेते दीपक केदार यांची काल भेट घेतली होती
व यावेळी दीपक केदार यांनी पोलीसंवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र पोलिसांनी या आरोपाच खंडण करत म्हटलं आहे की,
याप्रकरणी पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत दोन आरोपींना अटक केली आहे व एक आरोपी सध्या फरार आहे. तर मृतक हे कधीही सरपंच राहिलेले नाहीत किंवा ते माजी सरपंच सुद्धा नाहीत.
प्रायव्हेट पार्ट देखील कापला
जुन्या शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणातील मृत अशोक सोनुने यांच्या जीवाला धोका असल्याबाबत अनेक वेळा त्यांनी लोणार पोलिसांना कळवलं होतं तरी देखील पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याने हे हत्याकांड घडलं आहे.
त्यानंतरही अजूनही या प्रकरणात सर्व आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
प्रकरणातील फरार आरोपी मोकाट असल्याने पीडित कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच सोनुने यांचं मुंडक कापून दोन्ही हात कापत प्रायव्हेट पार्ट ही कापला गेला, असा गंभीर आरोप मृतकांच्या मुलाने केला आहे.
0 Comments